उल्हासनगर महापालिका शाळेची पटसंख्या अवघी ४ हजारावर; शिक्षण सभापतींचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 06:21 PM2021-08-01T18:21:21+5:302021-08-01T18:21:30+5:30
कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला. याबाबतचे निवेदन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना देऊन पटसंख्या वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची निकम यांनी मागणी केली.
उल्हासनगर महापालिकेच्या शाळा कोरोना संसर्गामुळे बंद असून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी शाळेच्या पटसंख्यावर झाल्याचे बोलले जात आहे. शेजारील बदलापूरसह अन्य शहराच्या महापालिका शाळेतील पटसंख्या वाढली. मात्र महापालिका शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी व मुलांत शिक्षणाबाबत आवड निर्माण होण्यासाठी ऑनलाईन शिकवणीद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संकल्पना शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी महापालिका प्रशासन अधिकाऱ्या समोर मांडली. सभापती शुभांगी बेहनवाल यांनी शिक्षण मंडळ कार्यालयाला भेट देऊन प्रशासन अधिकारी बी एन मोहिते याच्याशी अन्य अधिकाऱ्या सोबत चर्चा केली.
महापालिका शाळेत एकेकाळी १२ हजारा पेक्षा जास्त मुलांची पटसंख्या होती. ती ४ हजारावर आल्याने, आश्चर्य व्यक्त आहे. महापालिका शाळेत कोरोना काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास शाळेतील पटसंख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सभापती शुभांगी निकम यांनी आयुक्तांची भेट घेऊन, तसे निवेदन दिले. तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका रजपूत यांची भेट घेऊन शिक्षण मंडळाच्या समस्या मांडल्या आहेत. बहुतांश शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून शाळेच्या जागेवर भूमाफिया अवैधरित्या आरसीसी बांधकामे करीत असल्याची लेखी तक्रार गेल्या आठवड्यात भाजपच्या नगरसेविका कविता गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. याप्रकारने शाळा सुरक्षित नसल्याचे उघड झाले.
महापालिका शाळा इमारतीच्या जागेवर बांधकामे?
दोन वर्षा पूर्वी कॅम्प नं-१ येथील महापालिका शाळेची इमारत पाडून त्याजागी अवैध बांधकामे उभे करण्याचा घाट शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उधळून लावला होता. शाळा इमारती व त्यांच्या खुल्या जागेवर भूमाफियांचा डोळा असून कॅम्प नं-५ येथील शाळेच्या जागेवर बांधकामे होत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेविकेचे लेखी केली. महापालिका शाळा वाचविण्यासाठी अतिक्रमण विभागाने अश्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.