अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटणार

By admin | Published: December 9, 2014 02:21 AM2014-12-09T02:21:17+5:302014-12-09T02:21:17+5:30

विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात दिवसा तब्बल तासभर खलबतं झाली.

Ultimately, the opposition will have to face the opposition | अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटणार

अखेर विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटणार

Next
तासभर खलबतं : विधानसभेत काँग्रेसचे विखे तर विधान परिषदेत राष्ट्रवादीचे मुंडे 
नागपूर : विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात दिवसा तब्बल तासभर खलबतं झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याशी चर्चा केली, मात्र सायंकाळी दोन्ही काँगेसच्या नेत्यांची बैठक झाल्याने विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाले तर विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेत धनंजय मुंडे हे अनुक्रमे काँग्रेस व राष्ट्रवादीचे  विरोधी पक्षनेते होतील. राष्ट्रवादीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारे पत्र सभापती देशमुख यांना सोमवारी सादर केले. विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी किमान 32 सदस्य राष्ट्रवादीसोबत असल्याचे त्या पक्षाचे म्हणणो आहे तर काँग्रेसकडे 2क् सदस्य आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने यापूर्वीच दावा केलेला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद धनंजय मुंडे या तरुण सदस्याला देण्याचा निर्धार पवार यांनी केला आहे. धनंजय हे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणो असून त्यांना ताकद देऊन भाजपा विरोधात उभे करण्याची ही खेळी आहे. धनंजय यांचे पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय शत्रुत्व असल्याने तसेच भाजपामधील अंतर्गत मतभेदांची धनंजय यांना बारकाईने कल्पना असल्याने ते भाजपामधील अनेक नेत्यांना शह देतील. यापूर्वी शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना छगन भुजबळ या पूर्वाश्रमीच्या शिवसेना नेत्याला विरोधी पक्षनेतेपद देऊन पवार यांनी शिवसेनेला शह दिला होता. खडसे-तावडे या पक्षांतर्गत विरोधकांशी संघर्ष करणो फडणवीस यांना सहज शक्य असले तरी दांडगी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या पंकजा यांच्याशी संघर्ष करण्याकरिता राष्ट्रवादीने पुढे केलेला धनंजय हा मोहरा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही पथ्यावर पडणारा असल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि भाजपाने मराठवाडय़ातील मंत्री कमी संख्येने केल्याने असलेल्या असंतोषाचा लाभ उठवण्याचीही राष्ट्रवादीची ही खेळी आहे. (विशेष प्रतिनिधी) 
 
सभापतींकडे काँग्रेसचाही अजर्
विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या तुलनेत सदस्य संख्या कमी असतानाही काँग्रेसने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणारा अर्ज केला आहे. सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यास दुजोरा दिला. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने यापूर्वीच दावा केला असून तेथे काँग्रेसचे 42 सदस्य आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 सदस्य आहेत. बहुजन विकास आघाडी व अन्य काही सदस्यांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला पाठिंबा देणा:यांची संख्या 45 असल्याचा दावा त्या पक्षाने केला आहे.  
 
काँग्रेस-राष्ट्रवादीत संवाद सुरु 
1विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून वाद सुरु असतानाच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोमवारी एकत्र आले आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी तुटल्याने उभय पक्षांमधील थांबलेला संवाद सुरु झाला. दुष्काळ व शेतक :यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर एकत्र स्थगन प्रस्ताव आणण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला.
 
2सोमवारी काँग्रेसने दुष्काळाच्या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव दिला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसने औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रश्न उपस्थित करण्याचे ठरवले होते. मात्र शोकप्रस्तावामुळे ते शक्य झाले नाही. तेवढय़ात शिवसेनेने स्वत:च दुष्काळावर चर्चा करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्याचे ठरवले. याची कुणकुण लागल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून वाद असलेले हे दोन्ही पक्ष विधिमंडळात समन्वय साधण्याकरिता विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या बंगल्यावर एकत्र आले. 
 
3या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा झाली नाही. सभागृहातील समन्वयाबाबत झाली, असे काँग्रेसने सांगितले. मात्र दोन्ही काँग्रेसमधील खंडीत संवाद सुरु झाल्याने भविष्यात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देऊन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा करण्याचा तोडगा निघू शकतो. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेतील गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, संजय दत्त तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हेमंत टकले हे उपस्थित होते. 

 

Web Title: Ultimately, the opposition will have to face the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.