उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

By Admin | Published: July 18, 2016 03:09 AM2016-07-18T03:09:07+5:302016-07-18T03:09:07+5:30

उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे.

Umarolani garbage in Ulhas river | उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

उमरोलीचा कचरा उल्हास नदीत

googlenewsNext

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये दररोज जमा होणारा कचरा उल्हास नदीतील वावे नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे पाणी दूषित होत असून सरपंच, ग्रामसदस्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीत डिकसल, उमरोली, वावे, कोषाणे, पाली, पोतदार वसाहत ही गावे येत आहेत. सर्व गावांतील कचरा डंपिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे.त्यामुळे पाणी दूषित होत आहे. उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगराई, साथीचे आजार बळावण्याचा धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार संतापजनक आहे. सरपंचांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हा कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेवर टाकण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सरपंच मोनिका सालोखे यांच्याशी संपर्कसाधला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच उपसरपंच सोपान ठाणगे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही कचरा नदीपात्रात न टाकता खड्ड्यात टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.
>नदीचे पाणी दूषित
सर्व गावांतील कचरा डम्पिंग ग्राउंड अथवा गुरचरण जागेत टाकण्याऐवजी थेट घंटागाडीतून उल्हास नदीत टाकला जात आहे. त्यामुळे पाणी दूषित होत आहे.
उल्हास नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना कार्यरत असल्याने गावांमध्ये हे दूषित पाणी जाण्याची शक्यता आहे

Web Title: Umarolani garbage in Ulhas river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.