कार्ल्यातील 'एकविरादेवी' मंदिर अनधिकृत
By admin | Published: December 10, 2015 11:52 AM2015-12-10T11:52:09+5:302015-12-10T11:52:40+5:30
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचे मंदिर हे अनधिकृत आहे, असा दावा मावळच्या तहसीलदारांनी केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १० - राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कार्ला गडावरील श्री एकविरा देवीचे मंदिर हे अनधिकृत आहे, असा दावा मावळच्या तहसीलदारांनी केला आहे. मात्र यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एक महिन्याच्या आत मावळच्या तहसिलदारांनी याचा खुलासाकरून भाविरकांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, मावळ तहसीलदांनी मावळमधील ३५ गावांतील ३७ मदिरांची यादी प्रसिध्द करत ती अनधिकृत असल्याचे म्हटले होते. त्या यादीत पांडवकालीन कार्ला लेण्यांच्या गुंफेतील एकविरा देवीच्या मंदिराचाही समावेश करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने कार्ला गडावर पत्रकार परिषद घेऊन मावळ तहसिलदारांचा निषेध नोंदवण्यात आला. त्यावेळी बोलताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे म्हणाले, कार्ला मंदिराच्या जुन्या शिलालेखांवर १८५७ सालाचा उल्लेख आढळतो. यावरून या मंदिराच्या प्राचिनतेची कल्पना येते. तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या रेकॉर्डवरील हे मंदिर असताना तहसिलदारांनी ते अनधिकृतच्या यादीत टाकणे ही बाब अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे.