अनधिकृत नळजोडांनी पळविले पाणी
By admin | Published: June 30, 2014 11:53 PM2014-06-30T23:53:00+5:302014-06-30T23:53:00+5:30
शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत.
Next
>पुणो : शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. विशेष म्हणजे या नळजोडांची माहिती असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती, अपुरे मनुष्यबळ आणि सुरक्षे अभावी या नळजोडांवर कारवाई करणो महापालिकेस शक्य झालेले नाही. या नळजोडांमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनीही घेतलेल्या अनधिकृत नळजोडांचा समावेश असून त्यातील काही लोकप्रनिधींचींच्या घरात तर तब्बल डझनभर नळ जोड आहेत. त्यामुळे एकीकडे पालिका पाणीबचतीचा नारा देण्यासाठी आपला घसा कोरडा करीत असली तरी, दुसरीकडे मात्र, या अनधिकृत नळजोडांमुळे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे.
शहरात सुमारे साडेसात लाख मिळकती आहेत. त्यातील सुमारे साडेपाच लाख रहिवासी मिळकती असून सव्वा लाख व्यावसायिक मिळकती आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 20 हजार मिळकतींनाच नळजोड देण्यात आली असल्याची अधिकृत माहिती पालिका प्रशासनाकडे आहे तर तेवढेच अनधिकृत नळ शहरात असल्याची पालिकेची माहिती आहे. मात्र, या नळजोडांवर अद्याप कारवाई करण्याचे धाडस पालिका प्रशासनास झालेले नाही.(प्रतिनिधी)
मोटारीसाठी विशेष पथक
पाणीकपातीच्या कालावधीत मोटारी लावून पाणी खेचणा:या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित परिसरात आधी पाहणी करून त्यानंतर मोटारी वापणा:यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या अंतर्गत संबंधित नागरिकाची मोटार जप्त करण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे सूत्रंनी स्पष्ट केले.
कारवाईस गेल्यावर होते मारहाण
अशा अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षापासून उन्हाळ्यात हाती घेण्यात येते. मात्र, कारवाईस गेलेल्या पालिकेच्या कर्मचा:यांना मारहाण झाल्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. तसेच, कारवाईस गेलेल्या कर्मचा:यांना अनेकदा लोकप्रतिनिधींच्या रोषासही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ही माहिती असूनही अनेकदा पालिका प्रशासन चुप्पी साधून असून, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे.
कपातीच्या काळामध्ये शहरात समान पाणीपुरवठा
पुणो : कपातीच्या कालावधीत शहरातील प्रभागांमध्ये समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, शहरात ज्या भागात तांत्रिक कारणास्तव अथवा इतर कारणास्तव 24 तास अथवा सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे अशा भागांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. त्याबाबतच्या सूचना सर्व कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या असून, त्याबाबत लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने प्रशासनाने शहरात एक वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही शहराच्या काही भागांत तांत्रिक चुकांमुळे 24 तास, तसेच जाणीवपूर्वक दबावापोटी सहा तासांपेक्षा अधिक पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे काही प्रभागात ओला दुष्काळ, तर काही प्रभागात कोरडय़ा दुष्काळाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे कपातीच्या कालावधीत समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडून प्रभागांमध्ये होणा:या पाणीपुरवठय़ांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती सूत्रंनी दिली.(प्रतिनिधी)