सामाजिक ऋणानुबंधाची अखंड परंपरा

By admin | Published: August 26, 2016 01:53 AM2016-08-26T01:53:09+5:302016-08-26T01:53:09+5:30

स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम येत्या गणेशोत्सवात राबवण्यात येणार आहे

The unbroken tradition of social lien | सामाजिक ऋणानुबंधाची अखंड परंपरा

सामाजिक ऋणानुबंधाची अखंड परंपरा

Next

महेश चेमटे,

मुंबई- स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माटुंगा येथील प्रगती सेवा मंडळाच्या वतीने अनोखा उपक्रम येत्या गणेशोत्सवात राबवण्यात येणार आहे. सामाजिक भान जपण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रगती मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांची आणि येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मोफत बुद्ध्यंक आणि भावनांक यांची तपासणी या वेळी करण्यात येईल.
माटुंगा येथील अरोरा सिनेमाजवळील बी.आय.टी. चाळीत १९६६ साली उत्साही तरुणांनी सहा इंचांच्या गणेशमूर्तीची स्थापना करीत गणेशोत्सवास प्रारंभ केला. तेव्हापासून आजतागायत पारंपरिकतेची कास धरत प्रगती सेवा मंडळाने सामाजिक ऋणानुबंध जपत वारसा गणेशोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी मनुष्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
बहुतांशी वेळा नकारात्मक भावना दूर सारून सभोवताली सकारात्मक ऊर्जेमुळे यशस्वी होण्याची गुरुकिल्ली सापडते. लोकमान्य टिळकांच्या मूळ उद्देश लक्षात घेता यंदाच्या गणेशोत्सवात उच्च भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी ‘मोरया संशोधन केंद्र’ हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. त्याशिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही मंडळाचे अध्यक्ष अनिल गावंड यांनी दिली.
बी.आय.टी. चाळीतील प्रत्येक पिढीने भक्तीसह सामाजिक भान जपले. कानाला झेपेल अशा ढोल-ताशांच्या गजरात प्रगतीच्या गणरायाचे आगमन होते. गणेशोत्सवाच्या काळात स्वत:चे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न यंदाही प्रगती मंडळाकडून करण्यात येणार आहे. गतवर्षात परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक मदत, अदिवासी पाड्यांना भेट देणे अशा स्वरूपात अनोखी भक्ती केल्यानंतर यंदा मात्र मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कसा करता येईल, या विषयावर काम करण्यात येणार आहे.
>मूर्तीसाठी अहोरात्र काम करणाऱ्यांचा आणि गणेशभजनात अभंग-कीर्तनाने रात्र जागवणाऱ्यांचा मंडळाच्या वतीने गेल्या आठवड्यात सत्कार करण्यात आला. यात मूर्तिकार, सजावटकार, पदाधिकारी, लहान कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते या सर्वांचे अभिंनदन करण्यात येते. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सूचनांची योग्य ती दखलही घेतली जाते.
- कुलदीप पाटणकर, उपाध्यक्ष, प्रगती सेवा मंडळ

Web Title: The unbroken tradition of social lien

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.