चारित्र्यावर अकारण संशय घेणे म्हणजे क्रूरताच

By admin | Published: October 25, 2015 01:42 AM2015-10-25T01:42:21+5:302015-10-25T01:42:21+5:30

नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास

Uncertainty of character is a cruelty | चारित्र्यावर अकारण संशय घेणे म्हणजे क्रूरताच

चारित्र्यावर अकारण संशय घेणे म्हणजे क्रूरताच

Next

- दीप्ती देशमुख,  मुंबई
नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास देणे आणि तिचे आयुष्य भयावह करणे म्हणजे क्रूरताच आहे, असे निरीक्षण वांद्रे कुटुंब न्यायालयाने नोंदविले. पत्नीच्या गरजांकडे लक्ष देणे आणि त्या भागवणे, ही पतीची नैतिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यास प्रतिवादी (पती) अपयशी ठरला आहे, असे म्हणत कुटुंब न्यायालयाने त्याच्या पत्नीने केलेला घटस्फोट अर्ज मंजूर केला.
मधुचंद्राला जात असताना एका तिऱ्हाईताने पत्नीकडे बघितल्याने तिलाच सगळ्यांसमोर शिवीगाळ करणाऱ्या पतीपासून कुटुंब न्यायालयाने पत्नीची सुटका केली. समिधा पवार (बदललेले नाव) हिचा विवाह सागर पवार (बदललेले नाव) याच्याशी २८ नोव्हेंबर २००३ रोजी झाला. मात्र, सागर पवार मद्याच्या आहारी गेला होता व सतत संशय घेत होता. त्यामुळे समिधाने कुटुंब न्यायालयात घटस्फोट अर्ज केला होता. समिधाने केलेल्या अर्जानुसार, सागर मद्यपी असून, तो वैवाहिक कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरला आहे, तसेच तो अतिशय संशयी स्वभावाचे आहे.
‘श्रीवर्धनला मधुचंद्राला जात असताना एका व्यक्तीने मला पाहिले. त्यावरून सागर सगळ्यांसमोर मलाच ओरडला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून सागर सतत माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि त्यावरून मारहाण करायचा,’ असे समिधाने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे.
‘नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळते घेण्याचा प्रयत्न करत असते. सासरची मंडळी आणि नवऱ्याचा स्वभाव समजावून घेण्याचाही ती प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीत तिच्या चारित्र्यावर नाहक संशय घेऊन तिला मानसिक त्रास देणे आणि तिचे आयुष्य भयावह करणे म्हणजे क्रूरताच आहे,’ असे निरीक्षण कुटुंब न्यायालयाने नोंदवले. समिधाने सागर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावण्यासही अपयशी ठरला असल्याचे अर्जात म्हटले आहे. सागर दारू आणि जुगारासाठी लोकांकडून कर्ज घेत असे. मात्र, ते परत करीत नसल्याने लोक घरी मागायला यायचे. त्यामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला. घरखर्चासाठी सागर पैसे द्यायचा नाही.

शिवीगाळ आणि संशय
‘मधुचंद्राला जात असताना एका व्यक्तीने मला पाहिले. त्यावरून सागर सगळ्यांसमोर मलाच ओरडला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर किरकोळ कारणावरून सागर सतत माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि त्यावरून मारहाण करायचा,’ असे समिधाने घटस्फोटाच्या अर्जात म्हटले आहे.

Web Title: Uncertainty of character is a cruelty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.