सनबर्नवरील अनिश्चिततेचे सावट दूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2016 04:38 PM2016-12-28T16:38:18+5:302016-12-28T19:05:00+5:30
धार्मिक संघटनांनी केलेल्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनबर्न फेस्टिव्हलवरील अनिश्चिततेचे सावट आता दूर झाले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - धार्मिक संघटनांनी केलेल्या विरोधामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनबर्न फेस्टिव्हलवरील अनिश्चिततेचे सावट आता दूर झाले आहे. सनबर्नच्या आयोजनाला तहसीलदारांनी आधीच परवानगी दिलेली असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेली काही वर्षे गोव्यात आयोजित होत असलेला सनबर्न फेस्टिव्हल यावर्षी पहिल्यांदाच गोव्याबाहेर होत आहे. पुण्यात २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा फेस्टिव्हल होणार आहे. यामध्ये तब्बल १५० विदेशी कलाकार सहभागी होणार असून, सुमारे १६ विदेशी बँडच्या बारची रेलचेल येथे असणार आहे.