विखेंच्या नेतृत्वात आमदारांच्या आयातीला भाजपकडून ‘खो’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 04:04 AM2019-06-07T04:04:22+5:302019-06-07T04:04:46+5:30

विखे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांना भाजपत घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल नाहीत

Under the leadership of Vidhaina, the loss of MLAs is 'lost' by BJP! | विखेंच्या नेतृत्वात आमदारांच्या आयातीला भाजपकडून ‘खो’!

विखेंच्या नेतृत्वात आमदारांच्या आयातीला भाजपकडून ‘खो’!

Next

मुंबई : विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात दहाएक आमदार लवकरच भाजपत जाणार असल्याच्या बातम्या आहेत. मात्र भाजपमधूनच विखेंच्या नेतृत्वातील आयातीला खो दिला जात आहे. ‘तुम्हाला भाजपत यायचे असेल तर वैयक्तिक चर्चा करा, असा निरोप काँग्रेसच्या इच्छुक आमदारांना दिला जात असल्याची माहिती आहे.

विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे अलिकडे अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. स्वत: विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा राजीनामा देऊन तेही भाजपत जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अब्दुल सत्तार, भारत भालके, सुनील केदार, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर असे काही आमदार विखे यांच्या नेतृत्वात भाजपत जाणार असल्याच्या बातम्याही आल्या. मात्र, खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, विखे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांना भाजपत घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल नाहीत. त्यामुळेच विखे यांनी त्या आमदारांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

‘काँग्रेसच्या आमदारांना भाजपत जाताना त्यांच्या राजकीय भवितव्याचे काय या बाबत काही हमी हवी असणार. त्या बाबत भाजपच्या नेतृत्वाशी मी बोलू शकतो, असे या आमदारांना वाटत असल्याने ते माझ्या संपर्कात आहेत. याचा अर्थ मी त्यांचे नेतृत्व करीत आहे, असा होत नसल्याचे विखे यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.

भाजपत प्रवेश करू इच्छिणाऱ्या आमदारांशी मुख्यमंत्री वैयक्तिकरीत्या बोलत असल्याची माहिती आहे. जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार, भारत भालके, कालिदास कोळंबकर आदी आमदारांशी मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. त्यांना कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. मुख्यमंत्री म्हणतील तसा निर्णय मी घेईन, असे कोळंबकर यांनी आधीच म्हटले आहे.

Web Title: Under the leadership of Vidhaina, the loss of MLAs is 'lost' by BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.