नाशिकच्या शस्त्रसाठ्याचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, सतर्क राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 06:29 AM2017-12-16T06:29:21+5:302017-12-16T06:32:15+5:30

उत्तर प्रदेशातून चोरी करण्यात आलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुंबईतील तीन आरोपींपैकी बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७) याच्याविरुद्ध राज्यभरात ७०हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Underworld connections for Nashik's weapon, alert orders | नाशिकच्या शस्त्रसाठ्याचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, सतर्क राहण्याचे आदेश

नाशिकच्या शस्त्रसाठ्याचे ‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, सतर्क राहण्याचे आदेश

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : उत्तर प्रदेशातून चोरी करण्यात आलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुंबईतील तीन आरोपींपैकी बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७) याच्याविरुद्ध राज्यभरात ७०हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो अंडरवर्ल्डशी कनेक्ट असल्याने या प्रकरणाचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर येत आहे. तसेच गुन्ह्यांत वापरण्यात आलेली गाडी चोरीची असून ती सरकारी असल्याच्या धक्कादायक माहितीने तपास यंत्रणांही चक्रावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील गोदामातून शिवडीत राहणारा बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (२७), सलमान अमानुल्ला खान (१९) आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडेने (२३) लाखोंच्या शस्त्रसाठ्याची चोरी करून मुंबईकडे धाव घेतली.
या शस्त्रसाठ्यामध्ये १७ रिव्हॉल्व्हरसह दोन परदेशी बनावटीच्या गन्ससह १२ रायफली आणि ४ हजार १४२ जिवंत काडतुसांचा समावेश आहे.
शस्त्रसाठ्यासाठी वापरण्यात आलेल्या आलेल्या बोलेरो गाडीवरचा क्रमांक एमएच ०१ एसए ७४६० हा मुंबईतल्याच सरकारी गाडीचा असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
शिवाय या गाडीमध्ये आणखी एक नंबर प्लेट ( एमएच १५ एव्हाय ५६१९ ) मिळाली आहे. मात्र या दोन्ही गाडी क्रमांकांबाबत कुठलीच माहिती वाहतूक विभागाकडे उपलब्ध नाही. ते जुने क्रमांक असून ही गाडीही चोरीची असल्याचे समजते.

सतर्क राहण्याचे आदेश
शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सर्व वरिष्ठ अधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २५ डिसेंबर तसेच ३१ डिसेंबर रोजी त्यांची सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वच तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

Web Title: Underworld connections for Nashik's weapon, alert orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.