ऑनलाइन फार्मसीमध्ये ‘अंडरवर्ल्ड’

By admin | Published: July 23, 2014 02:34 AM2014-07-23T02:34:03+5:302014-07-23T02:34:03+5:30

‘ऑनलाईन फार्मसी’ व्यवहारात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतातील लोक सामील असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

'Underworld' in online pharmacy | ऑनलाइन फार्मसीमध्ये ‘अंडरवर्ल्ड’

ऑनलाइन फार्मसीमध्ये ‘अंडरवर्ल्ड’

Next
नागपूर : ‘ऑनलाईन फार्मसी’ व्यवहारात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतातील लोक सामील असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात इंटरपोल मार्फत तपास सुरू असतानाच आपल्या देशात प्रथमच महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई सुरू केली आहे. या धर्तीवर अन्य राज्यांकडूनही अशा पद्धतीने कारवाई व्हावी, यादृष्टीने पावले उचलावी, असे निर्देश वाणिज्य मंत्रलयाने ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला दिले आहेत. एफडीए सोबतच सीबीआयमार्फत कारवाईची मागणी शासनाकडे केली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांनी दिली.
  रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. झगडे म्हणाले, औषधांच्या संदर्भात हजारो वेबसाईट सुरू आहेत. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून इच्छुक ग्राहकांची मागणी नोंदवून घेतली जाते आणि नंतर येथील घाऊक विक्रेत्यांकडून ती परदेशात पाठवली जातात. अशा औषधांमध्ये नशेसाठी वापरली जाणारी आणि कामोत्तेजक औषधे अधिक प्रमाणात असतात. या प्रकरणात गुन्हेगारी वर्तुळातील लोक गुंतले असल्याने इंटरपोलमार्फत ‘ऑपरेशन पँजिया’ या नावाने तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. 
यंदाच्या पँजियात जगभरातील 1क्क् वर देशांमधील 214 प्रतिबंधात्मक यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जगभरात 1क् हजारांवर वेबसाईट बंद करून 216 जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा व्यापार मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. गेल्या दीड-दोन वर्षात राज्यभरात  35 ते 4क् तर नागपुरात 13 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. याविरोधात काहींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही. दुसरीकडे केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रलयाने या कारवाईचे स्वागत केले असून संपूर्ण देशात अशा प्रकारची कारवाई होण्याबाबत पावले उचलली जात आहेत, असेही झगडे म्हणाले. (प्रतिनिधी)
 
च् एका प्रश्नाच्या उत्तरात ‘ऑनलाईन फार्मसी’ हा व्यवसाय निर्यातीचा नाही तर स्मगलिंगचा आहे, अशी पुस्ती झगडे यांनी जोडली. ते म्हणाले, बेनामी वेबसाईटवरून जगभरात सर्रास औषधांची विक्री सुरू आहे. ही पद्धत जीवघेणी ठरत आहे. याप्रकारावर वेळीच र्निबध घातले गेले नाहीत तर संपूर्ण मानवी जीवनच संकटात येण्याचा धोका आहे.

 

Web Title: 'Underworld' in online pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.