बेरोजगार भूवैज्ञानिकांना कंत्राटी तत्त्वावर कामे देणार, बबनराव लोणीकर यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 06:19 AM2018-07-13T06:19:31+5:302018-07-13T06:20:00+5:30

बी.एस्सी. जिओलॉजी आणि एम.एस्सी. जिओलॉजी झालेल्या बेरोजगार भूवैज्ञानिकांना सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाच्या धर्तीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील विविध कामे कंत्राटी तत्त्वावर देण्याच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवरी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

unemployed geologists news | बेरोजगार भूवैज्ञानिकांना कंत्राटी तत्त्वावर कामे देणार, बबनराव लोणीकर यांची माहिती

बेरोजगार भूवैज्ञानिकांना कंत्राटी तत्त्वावर कामे देणार, बबनराव लोणीकर यांची माहिती

Next

नागपूर : बी.एस्सी. जिओलॉजी आणि एम.एस्सी. जिओलॉजी झालेल्या बेरोजगार भूवैज्ञानिकांना सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाच्या धर्तीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील विविध कामे कंत्राटी तत्त्वावर देण्याच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी गुरुवरी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
डॉ. शशिकांत खेडेकर यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना लोणीकर यांनी सांगितले की, यासंदर्भात लोकप्रतिनिधीकडून निवेदन प्राप्त झाले असून तसा निर्णय घेण्यात येईल.
विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅकप्रकरणी सायबर सेलकडून तपास सुरू
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅकप्रकरणी नाशिक येथील पोलीस सायबर सेलकडून तपास सुरू आहे. तसेच विद्यापीठ स्तरावरही कार्यवाही सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
संग्रम थोपटे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार आदींंनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विनोद तावडे यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून नाशिकमधील इंजिनियरिंगच्या दोन विद्यार्थ्यांनी बीएस्सी द्वितीय वर्षाच्या प्रश्नपत्रिका लीक केल्या होत्या. नाशिक जिल्ह्यातील १८०० विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात आली होती.

Web Title: unemployed geologists news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.