मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:12 PM2021-11-05T21:12:09+5:302021-11-05T21:13:07+5:30

फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर देखील मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले.

unexpected boil firecrackers in Mira Bhayandar 27 fire incidents on Diwali night | मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना

मीरा भाईंदरमध्ये बिनधास्त फोडा फटाके; दिवाळी रात्री २७ आगीच्या घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - फाटके आणि ध्वनिप्रदूषणावर बंदी असून देखील मीरा भाईंदर मध्ये मात्र सर्रास गुरुवारच्या मध्यरात्रीनंतर देखील मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यात आले . या मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊन देखील पोलिसांसह महापालिके कडून मात्र कारवाई झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे . तर शहरात गुरुवारी रात्री २७ आगीच्या घटना घडल्या आहेत . 

मोठ्या आवाजाच्या प्रदूषणकारी फटाक्यांना बंदी असून त्याच सोबत ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायदा आदींचे मीरा भाईंदर मध्ये दिवाळी निमित्त सर्रास उल्लंघन केलेले दिसून आले . गुरुवारी तर मध्यरात्री नंतर देखील सर्रास मोठे फटाके फोडले जात होते .  शुक्रवारी रात्री देखील तशीच स्थिती होती . 

मुळात महापालिकेनेच नियमबाह्यपणे फटाके विक्रीच्या वारेमाप परवानग्या देऊन मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि भारतीय विस्फोटक कायद्यासह शासन आदेशाचे उल्लंघन केले . लोकांच्या सुरक्षे ऐवजी फटाके विक्रेत्याना फायदा करून देत त्यांची मर्जी सांभाळली . पालिकेनेच शहरात फटाके फोडण्यासह ध्वनी व वायू प्रदूषण करण्यास मोकळीक दिली . 

त्यातच गुरुवारी रात्री शहरात तब्बल २७ ठिकाणी आगी  लागण्याच्या घटना घडल्या आहेत . त्या मध्ये तब्बल १९ ठिकाणी आगी ह्या फटाक्यांच्या कचऱ्या मुळे तर ७ ठिकाणी आगी ह्या शॉर्टसर्किट मुळे तर रामदेव पार्क येथील एका गॅरेजला आग लागल्याचे अग्निशमन दला कडून सांगण्यात आले . 

बहुतांश आगी ह्या फटाक्यां मुळे लागलेल्या असल्याचे स्पष्टच असून महापालिका आणि नगरसेवक ह्याला कारणीभूत असल्याचे आरोप जागरूक नागरिक करत आहेत . फटाक्यां मुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुराचे वलय आकाशात दिवसा सुद्धा जाणवत होते . धुरा मुळे आणि आवाज मुळे रुग्ण , वृद्ध व बाळांना त्रास सहन करावा लागला . 

ओम वसुंधरा इमारतीत कपड्याच्या दुकानास आग लागून ३ लाखांचे नुकसान झाले .  पूनम गार्डन , सिल्वर पार्क , नया नगर , विजय पार्क , पेणकरपाडा , कनकिया , ठाकूर मॉल जवळ , विनय नगर , शिवार उद्यान , डिव्हाईन चर्च समोर, भीमसेन जोशी रुग्णालया जवळ , भाईंदर बसडेपो जवळ , आझाद नगर  आदी परिसरात आगी लागण्याच्या घटना घडल्या . महापालिकेच्या त्या त्या भागातील अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन आगी नियंत्रणात आणल्या . सुदैवाने कोणत्या घटनेत जीवित हानी झालेली नाही .
 

Web Title: unexpected boil firecrackers in Mira Bhayandar 27 fire incidents on Diwali night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.