दुर्दैवी...नाशिकमध्ये स्कार्फ फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 08:52 PM2018-07-23T20:52:42+5:302018-07-23T20:54:25+5:30

झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु

 Unfortunately ... death of a nine-month spurt in a scorpion trap in Nashik | दुर्दैवी...नाशिकमध्ये स्कार्फ फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

दुर्दैवी...नाशिकमध्ये स्कार्फ फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसातपूरच्या शिवाजीनगरमध्ये घटना ; परिसरात हळहळ

नाशिक : झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्फचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली़ आराध्या योगेश खाडपे (समर्थ रेसीडेन्सी, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या शिवाजीनगरमधील समर्थ रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये योगेश खाडपे हे पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी आराध्यासह राहातात़ सोमवारी (दि़२३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनिषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हिस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्फने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या़

या दरम्यान, चिमुकली आराध्या ही झोळीतून सरकत-सरकत खाली असता, झोळीला बांधलेल्या स्कार्फ तिच्या गळ्याभोवली अडकून तिला गळफास बसला़ ही बाब आई मनिषा खाडपे यांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. योगेश खाडपे यांनी बेशुद्ध अवस्थेतील आराध्यास दुपारी तीन वाजेच्या सुमारास तातडीने जिल्हा रुग्णालयातदाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, यापुर्वीही नाशिक शहरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत़ लहान मुले खेळत असताना वा झोपलेले असताना घरातील सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे़

--इन्फो--
नाशिक शहरातील दुर्दैवी घटना
* १० आॅगस्ट २०१७
सिडकोतील हनुमान चौकात आठ महिन्यांच्या वीर विनोद जयस्वाल या चिमुकल्यास खेळण्यासाठी दिलेला फुगा त्याच्या घशात अडकून श्वासोच्छवास बंद होऊन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १० आॅगस्ट २०१७ रोजी घडली होती़

* ३० जानेवारी २०१८
अशोका मार्गावरील जेएमसीटी महाविद्यालयामागील सोसायटीतच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने चार वर्षाच्या हसनेन मोईन सय्यद या एकुलता एक मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ३० जानेवारी २०१८ रोजी घडली होती़

*५ फेब्रुवारी २०१८
नाशिकरोडजवळील चांदगिरी येथील चार वर्षीय मुलगी शालिनी दत्तात्रय हांडगे ही रडत असल्याने तिच्या आईन खाऊसाठी दहा रुपयांचे नाणे दिले होते़ शालिनी हीने हे नाणे आईच्या नकळत गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती़

*१६ फेब्रुवारी २०१८
सिडकोतील हनुमान चौकात घरात खेळत असलेला एक वर्षीय सुजय जयेश बिजुटकर या चिमुकल्याच्या घशात हरभºयाचा दाणा अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १६ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती़

Web Title:  Unfortunately ... death of a nine-month spurt in a scorpion trap in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.