अर्थसंकल्पात शिवस्मारकाचा साधा उल्लेखही नसणे दुर्दैवीच : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 01:08 PM2019-06-19T13:08:50+5:302019-06-19T13:11:04+5:30
मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, स्मारक उभारणीचे काम म्हणावे तसे वेगाने होत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे.
मुंबई - विद्यमान राज्य सरकारने मंगळवारी आपला अखेरचा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र या अर्थसंकल्पात अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकासंदर्भात साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. यावर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. मुंडे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
राज्यातील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सत्तेत आले आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रलंबित असलेल्या शिवस्मारकाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, ही बाब दुर्दैवी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करत हे सरकार निवडून आले मात्र प्रलंबित महाराजांच्या स्मारकाचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, ही बाब अत्यंत निंदनीय आहे. #MonsoonSession#budget
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 18, 2019
मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, स्मारक उभारणीचे काम म्हणावे तसे वेगाने होत नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजी आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांमध्ये शिवस्मारक उभारण्याची मागणी प्रमुख होती. मात्र या अर्थसंकल्पात शिवस्मारकासंदर्भात काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.