बेसुमार वाळूउपशाने गोदेवरील पूल खचला

By admin | Published: November 9, 2014 02:49 AM2014-11-09T02:49:29+5:302014-11-09T02:49:29+5:30

गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला.

The unheard-by-sand pool has lost the bridge | बेसुमार वाळूउपशाने गोदेवरील पूल खचला

बेसुमार वाळूउपशाने गोदेवरील पूल खचला

Next
दोन तालुक्यांचा संपर्क तुटला
औरंगाबाद/पैठण : गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळूपट्टय़ांची मुदत संपूनही वाळूमाफियांनी  उपसा सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी पुलांच्या पायथ्याची वाळूसुद्धा उपसली जात आहे. अशा वाळूउपशामुळे पैठण तालुक्यातील आपेगाव  आणि गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल कमकुवत झाला होता. त्यात शुक्रवारी जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी बंधा:यांसाठी गोदावरी नदीच्या पात्रत पाणी सोडण्यात आले. आधीच कमकुवत झालेला हा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खिळखिळा झाला. पाण्याच्या प्रवाहामुळे पायाजवळील भरावाचा आधार निखळला. त्यामुळे हा पूल मधोमध खचला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या घटनेनंतर काही गावक:यांनी वेळीच येथून येणा:या-जाणा:या वाहनांना सूचना दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 
बारा वर्षापूर्वी झाले पुलाचे बांधकाम
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2क्क्2 साली या पुलाचे बांधकाम झाले होते. हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा असल्याने येथून वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पूल खचल्यामुळे वाहनांची ये-जा आता बंद झाली आहे. या घटनेविषयी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निवृत्ती चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या बाहेरगावी आहे; पण शाखा अभियंता बी.बी. जायभाये यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनीही बांधकाम विभागाशी संपर्क साधून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)
 
वाहतूक बंद : सदरहू पुलावरील वाहतूक पूर्णपणो बंद केली आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे लोकांनी भीतिपोटी पुलावरून पायी जाणोही बंद केले आहे. 
पाटेगाव पुलाची तपासणी करावी : गोदावरी नदीवरील पैठण - शेवगाव रोडवरील पाटेगावजवळील पुलाच्या शेजारीही वाळूमाफियांकडून अमाप वाळूउपसा सुरू आहे. यामुळे हा पूलही कमकुवत झाला. या पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलाचीही तपासणी करावी, अशी मागणी स्थानिक करीत आहेत. 
 
हव्यासाचा अतिरेक : गोदापात्रत अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. या अतिरेकी हव्यासाचा फटका शनिवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातल्या कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणा:या पुलाला बसला. पुलाच्या पायथ्याशीच वाळूमाफियांनी बेसुमार उपसा केला. शुक्रवारी जायकवाडी धरणातून आपेगाव बंधा:याकरिता गोदापात्रत पाणी सोडताच पुलाला ठिकठिकाणी तडे गेले. (इन्सेटमध्ये) पुलाच्या पायथ्याशी वाळूचा कसा उपसा सुरू होता त्याचे दोन दिवसांपूर्वीच टिपलेले छायाचित्र.

 

Web Title: The unheard-by-sand pool has lost the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.