इंदापूर शहराला अस्वच्छ पाणी
By admin | Published: June 13, 2016 01:37 AM2016-06-13T01:37:07+5:302016-06-13T01:37:07+5:30
नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी शहरात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला.
इंदापूर : नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने रविवारी शहरात अस्वच्छ पाण्याचा पुरवठा केला. त्यामुळे लोक चांगलेच संतापले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी नळाला आलेल्या व जलशुद्धीकरण केंद्रावरच्या पाण्याचे नमुने बाटल्यांमध्ये भरुन घेतले आहेत. उद्या हे पाणी आपण मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाजणार आहोत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नळाला आलेले पाणी पाहिल्यानंतर ते पाणी बाटलीत भरुन घेतले. सरस्वतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन तेथील पाण्याचा नमूनाही आपण घेतला. पाणी शुध्द करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी ही त्यांनी केली.
दरम्यान, निम्म्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तरंगवाडी तलावातील पाणी संपले आहे. तेथील गाळमिश्रीत पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत आहे. ते जरी शुध्द केले असले तरी ते नागरिकांनी गाळून, उकळून प्यावे असे आवाहन नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (वार्ताहर)