Leena Nair Global CEO Of CHANEL : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:12 AM2021-12-15T11:12:25+5:302021-12-15T11:13:35+5:30

Leena Nair : नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Unilevers CHRO Indian origin kolhapur leena nair appointed as Global CEO of french luxury group chanel | Leena Nair Global CEO Of CHANEL : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

Leena Nair Global CEO Of CHANEL : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका; फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती

Next

भारतीय वंशाच्या आणि मुळच्या कोल्हापूर येथील असलेल्या लीना नायर (Leena Nair) यांची मंगळवारी लंडन येथील फ्रेंच लक्झरी समूह शनेलच्या (Chanel) जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 52 वर्षीय लीना नायर या युनीलीव्हरमधील (unilever) सर्वात कमी वयाच्या पहिला महिला मुख्य मानव संसाधन अधिकारी होत्या. त्या 2016 मध्ये  युनीलीव्हरच्या सीएचआरओ झाल्या होत्या. यापूर्वी त्या Anglo-Dutch कंपनीच्या लंडन हेडक्वॉर्टरमध्ये लिडरशीप आणि ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट ग्लोबल व्हाइस प्रेसिडेंट होत्या. (leena nair appointed as Global CEO of french luxury group chanel)

लीना नायर यांचा लंडनमध्ये डंका - 
लंडनमध्ये डंका वाजवणाऱ्या लीना नायर यांनी आपले शालेश शिक्षण कोल्हापूर येथील होली क्रॉस शाळेतून पूर्ण केले. यानंतर, सांगली येथील वालचंद महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. तर जमशेदपूर येथील झेव्हियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले.

लिना नायर या युनीलीव्हरमध्ये मुख्य मानव संसाधन अधिकारी होत्या. त्यांचे आभार मानताना युनीलीव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन जोप म्हणाले, लीना यांनी साधारणपणे गेली तीन दशके कंपनीसाठी अत्यंत महत्वाचे योगदान दिले आहे. नायर या गेल्या 2013 मध्ये लंडन येथे शीफ्ट झाल्या होत्या. 'करिअर बाय चॉईस' या उपक्रमाच्या माध्यमातून, काम सोडलेल्या महिलांना पुन्हा काम देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

 

Web Title: Unilevers CHRO Indian origin kolhapur leena nair appointed as Global CEO of french luxury group chanel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.