CoronaVirus Update: कोरोना व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी; केंद्रीय पथकाचा महाराष्ट्रावर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:34 PM2021-04-12T21:34:29+5:302021-04-12T21:35:58+5:30

CoronaVirus Update: प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

union health secretary rajesh bhushan gave report on corona situation in maharashtra state | CoronaVirus Update: कोरोना व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी; केंद्रीय पथकाचा महाराष्ट्रावर ठपका

CoronaVirus Update: कोरोना व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी; केंद्रीय पथकाचा महाराष्ट्रावर ठपका

Next
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेकडून पुरेसे लक्ष दिले जात नाहीरुग्णालयांमध्ये बिघडलेली कृत्रिम श्वासनयंत्रेकेंद्रीय पथकाचा महाराष्ट्राच्या व्यवस्थापनातील त्रुटींवर ठपका

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सलग ५० हजारांवर रुग्णसंख्या आढळून आल्याने केंद्र सरकारकडून एक पथक राज्यातील कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते. या केंद्रीय पथकाने आपला अहवाल दिला असून, यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर (CoronaVirus Update) नियंत्रण ठेवण्यास राज्य सरकार कमी पडले. तसेच प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवले असून, प्रशासकीय आरोग्य यंत्रणेला पुन्हा सतर्क होण्याची सूचना केली आहे. (union health secretary rajesh bhushan gave report on corona situation in maharashtra state)

या पत्रामध्ये जिल्ह्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारे सात प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत. राज्यातील ३० जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी ही पथके करत असून त्यांच्याकडून दररोज केंद्र व राज्य सरकारांना अहवाल दिला जात आहे. तसेच  या पथकाकडून गरजेनुसार जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना आणि सल्ला दिला जात आहे. केंद्रीय पथकाने भेट दिलेल्या एकाही जिल्ह्यामध्ये करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले. 

केंद्रीय पथकाच्या पत्रातील ठळक मुद्दे

सातारा, सांगली, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष झाले असून, संभाव्य रुग्णांच्या देखरेखीमध्ये सातत्याचा अभाव आहे. तसेच बुलढाणा, सातारा, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये प्रभावी देखरेख ठेवली गेली नाही. संभाव्य रुग्णांची शोधमोहीम अपेक्षेप्रमाणे झाली नाही. यामागे मनुष्यबळाची कमतरता हे प्रमुख कारण आहे. भंडारा जिल्ह्यामधील बहुतांश रुग्ण नियंत्रित क्षेत्राबाहेर आढळले आहेत. त्यामुळे नियंत्रित क्षेत्रांची संख्या आणि त्याचा परीघ वाढवण्याची गरज असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

प्रशासकीय यंत्रणेकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही

भंडारा व सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण घरगुती विलगीकरणात असल्याचे आढळले. अशा परिस्थितीत मृत्यूदर कमी करण्यासाठी या रुग्णांवर अत्यंत काळजीपूर्वक देखरेख ठेवण्याची गरज असते पण, घरगुती विलगीकरणातील रुग्णांकडे प्रशासकीय यंत्रणेकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. सातारा, भंडारा, पालघर, अमरावती, जालना, लातूर या जिल्ह्यांमध्ये नमुना चाचणीची क्षमता अपुरी पडू लागली आहे.  नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आरटी-पीसीआर आणि अतिजलद प्रतिद्रव्य चाचणी यांच्यातील प्रमाण असंतुलीत आहे, असे यात म्हटले आहे. 

टाळी-थाळी, उत्सव खूप झालं, आता देशाला आधी लस द्या; राहुल गांधी कडाडले

रुग्णालयांमध्ये बिघडलेली कृत्रिम श्वासनयंत्रे

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, कृत्रिम श्वासनयंत्रांची कमतरता असून रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण मात्र वाढू लागले आहे. औरंगाबाद जिल्ह्याला गंभीर करोना रुग्णांच्या उपचारासाठी शेजारील जिल्ह्यांच्या सुविधांवर अवलंबून राहावे आहे. भंडारा, पालघर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सीजनचा तुटवडा आहे. सातारा आणि लातूर जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये बिघडलेली कृत्रिम श्वासनयंत्रेही आढळली. औरंगाबाद, नंदूरबार, यवतमाळ, सातारा, पालघर, जळगाव, जालना जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. आरोग्य सेवकांच्या कामाचे नियोजन, कंत्राटी पद्धतीने त्यांची भरती तातडीने भरती करून मनुष्यबळ वाढण्याची गरज आहे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे. 

दरम्यान, संबंधित जिल्ह्यांमध्ये नमुना चाचणी, रुग्णांची शोधमोहीम आणि प्रतिबंधात्मक विभागांमधील व्यवस्था, करोनासंदर्भातील नियमांचे पालन व त्यांची अंमलबजावणीची स्थिती, रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा, ऑक्सिजन सुविधा- वैद्यकीय सुविधा- अतिदक्षता विभाग तसेच अन्य विभागातील खाटांची उपलब्धता आणि लसीकरणाचा वेग अशा प्रमुख पाच बाबींचा आढावा घेण्याची सूचना केंद्रीय पथकांना करण्यात आली होती.
 

Web Title: union health secretary rajesh bhushan gave report on corona situation in maharashtra state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.