“२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 06:44 PM2023-04-23T18:44:01+5:302023-04-23T18:45:18+5:30

Maharashtra Politics: लातूरकर भाग्यवान आहेत. कोच फॅक्टरी, वंदे भारत ट्रेन अशा अनेक गोष्टी सहज शक्य आहेत, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

union minister and bjp leader raosaheb danve claim that after 2024 he will be continues as the rail minister | “२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे

“२०२४ नंतर उर्वरित मागण्या पूर्ण करु, पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार”: रावसाहेब दानवे

googlenewsNext

Maharashtra Politics: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधात सगळे विरोधी पक्ष एकवटले असून, तगडी टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढील टर्मलाही मीच रेल्वेमंत्री असणार असल्याचा दावा केला आहे. 

माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, २०१४ पूर्वी मराठवाड्याचे रेल्वे बजेट हे चौदाशे कोटी रुपये इतकेच असायचे. २०१४ नंतर मराठवाड्यासाठी रेल्वे बजेट हे खूप वाढले. आता १२ हजार कोटी रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. लातूरकरांच्या अनेक मागण्या असतात. रेल्वेमंत्री होऊन मी दीडच वर्षे झालेला आहे. तुमच्या प्रस्तावित अनेक मागण्यांपैकी काही मागण्या या टर्ममध्ये मंजूर करतोय. तर काही मागण्या या २०२४ नंतर पुढील सरकारमध्ये मंजूर करू, त्यावेळेसही रेल्वेमंत्री मीच असणार आहे, अशी मिश्किल टिपणी रावसाहेब दानवे यांनी केली. 

लातूरकर खरेच भाग्यवान आहेत

लातूरकर खरेच भाग्यवान आहेत. कोच फॅक्टरी, वंदे भारत ट्रेन अशा अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सहज शक्य आहेत. मराठवाड्यातील सुधारलेला जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे तर जालना हा मागासलेला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे सरकार असल्याकारणाने शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असेही रावसाहेब दानवे यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: union minister and bjp leader raosaheb danve claim that after 2024 he will be continues as the rail minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.