कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:28 PM2024-10-14T12:28:23+5:302024-10-14T12:31:24+5:30

Murlidhar Mohol : काल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना रस्त्यातच त्यांचा तालमीतील जुना मित्र भेटला .

Union Minister Muralidhar Mohol met his old friend from Talmi in kolhapur | कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...

कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...

Murlidhar Mohol ( Marathi News ) : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना त्यांच्याच बंदोबस्तात तालमीतील एक जुना मित्र भेटला. मोहोळ यांचा जुना मित्र कोल्हापूर पोलीस तलामध्ये कर्तव्यास आहे, बंदोबस्तामध्ये त्यांना पाहताच मुरधीर मोहोळ यांनी  चालकाला सांगून ताफा थांबवायला सांगितला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी

या भेटीबाबतचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळ यांच्या सोशल मिडिया प्लॅफॉर्म एक्सवरही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, 'संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता माझ्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारा माझा कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आला. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला'.

'इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला', असंही मोहोळ यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुरलीधर मोहोळ हे काही काळ कोल्हापूरात होते. यावेळी तालीमही केली आहे. याबाबतचे किस्से त्यांनी याआधीही आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले आहे.

 

महापौर ते थेट केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात नगरसेवक पदावरुन सुरुवात केली. पुढे ते सलग पाच वर्षे महापौर पदावर काम केले. यानंतर त्यांना जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खासदारकीचे तिकिट दिले. 

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना चितपट केले. भाजपाने त्यांच्यावर पहिल्याच टर्ममध्ये मंत्रि‍पदाची जबाबदारी दिली आहे.

Web Title: Union Minister Muralidhar Mohol met his old friend from Talmi in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.