“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:17 AM2024-05-30T10:17:38+5:302024-05-30T10:21:34+5:30

Ramdas Athawale News: जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी टीका केली.

union minister ramdas athawale criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue | “जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक

Ramdas Athawale News: महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे महाडमधील क्रांतिस्तंभाजवळ मनुस्मृती दहन आंदोलन करीत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. 

जितेंद्र आव्हाड यांचे आंदोलन हे शरीरातून मनुस्मृती घालावण्याचा प्रकार आहे. मनातून मनुस्मृती गेली का? मनातून जोपर्यंत मनुस्मृती जात नाही, तोपर्यंत आपण कृती करताना ती डोळस राहत नाही. जितेंद्र आव्हाडांनी धर्मवादी, निरपेक्षवादी, धर्मवादी आहे, असा ढिंढोरा पिटला तरी आधी त्यांनी मनातून मनुस्मृती काढावी, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करत अटकेची मागणी केली आहे.

लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो फाडून त्यांचा अपमान केला. जितेंद्र आव्हाडांना जाब विचारणे अवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना अटक करावी, अशी मागणी करणार आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी राज्यातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे, या शब्दांत रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, वसंत मोरे यांच्या नेतृत्वात पुण्यात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवला. तसेच जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्याची मागणीही केली. जितेंद्र आव्हाड यांना मनोविकार तज्ज्ञाला दाखवा. मग शांत होईल. त्यांना मानसोपचाराची गरज आहे, या शब्दांत वसंत मोरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी निषेधाच्या घोषणा देत अजित पवार गटाने ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले.
 

Web Title: union minister ramdas athawale criticized ncp sp group jitendra awhad over babasaheb ambedkar photo issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.