"निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:18 PM2024-01-02T14:18:38+5:302024-01-02T14:20:11+5:30

मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याचं मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही

Union Minister Ramdas Athawale criticized Prakash Ambedkar along with Maha Vikas Aghadi | "निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू"

"निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्म्युल्याचे आम्ही बारा वाजवू"

धुळे - महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून त्यात रोज नवनवीन फॉर्म्युला समोर येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला दिलेल्या १२-१२ च्या फॉर्म्युल्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. जर १२-१२ फॉर्म्युला ठरला तर आमचे त्यांचे बारा वाजवू असा टोला आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांसह महाविकास आघाडीला लगावला आहे. 

आठवले धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रामदास आठवले म्हणाले की, वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो १२-१२ चा फॉर्मुला ठरला आहे. तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली. 

त्याचसोबत २०२४ च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले आणि इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरवू शकतो मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याचं मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून जरांगे पाटील यांची आहे. छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Web Title: Union Minister Ramdas Athawale criticized Prakash Ambedkar along with Maha Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.