“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 05:02 PM2023-09-06T17:02:26+5:302023-09-06T17:02:58+5:30

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

union minister ramdas athawale reaction about maratha reservation agitation | “मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

googlenewsNext

Maratha Reservation: जालन्यातील अंतरवालीमधील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आठवडाभरापासून अधिक दिवस उपोषण सुरू आहे. अनेक नेते, मंत्री जालन्यात जाऊन आले. मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. यातच आता मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलन, आरक्षण या मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांडे पाटील उपोषणाला बसलेत त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावे लागेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असे त्यांचे मत आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला त्यात टाकता येत का, हे बघावे किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावे, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी मांडले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे, असे सांगत राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. जरांडे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, आम्ही सगळे भारतीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे नाव ओरिजनल आहे, INDIA हे इंग्रजी नाव आहे, त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 


 

Web Title: union minister ramdas athawale reaction about maratha reservation agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.