“प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये, त्यापेक्षा...”; रामदास आठवलेंची खुली ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 05:10 PM2023-05-29T17:10:51+5:302023-05-29T17:12:03+5:30

Ramdas Athawale-Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन काही मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

union minister ramdas athawale said vba prakash ambedkar should alliance with bjp | “प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये, त्यापेक्षा...”; रामदास आठवलेंची खुली ऑफर!

“प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये, त्यापेक्षा...”; रामदास आठवलेंची खुली ऑफर!

googlenewsNext

Ramdas Athawale-Prakash Ambedkar: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुतांश पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीनेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली तरी जागावाटपावरुन मविआत बिघाडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडीत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यावरून आता रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक ऑफर दिली आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपबरोबर येण्याची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी इकडे तिकडे फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

३२ राज्यात रिपब्लिकन पक्ष काम करत आहे

३२ राज्यात रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. प्रत्येक राज्यात पक्ष वाढवण्याचे काम सुरू आहे. आपल्याला महाविकास आघाडीबरोबर संघर्ष करायचा आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूने असतो, त्यांनाच सत्ता मिळते. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर सांगतात की, वंचित आघाडी ज्यांच्याबरोबर असते, त्यांना सत्ता मिळते. वंचित आघाडी स्वत:च्या जीवावर निवडणूक लढते आणि पण त्यांचे उमेदवार पडतात, असे आठवले यांनी सांगितले. तसेच वंचित आघाडीच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता आली नाही. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये. तुम्हाला भाजपबरोबर घेऊन जातो. आपण भाजप आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुया. उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत, ते मला माहिती आहे. त्यामुळे मी भाजपबरोबर आलो आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे महायुतीत आले, तर स्वागतच आहे. तसेच, महिला, दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली. 

 

Web Title: union minister ramdas athawale said vba prakash ambedkar should alliance with bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.