Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:52 PM2022-07-31T14:52:46+5:302022-07-31T14:53:37+5:30

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि भाजपने आगामी निवडणुका एकत्रितपणे लढवायचे ठरवल्यास जागावाटप ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

union minister raosaheb danve make it clear to eknath shinde group bjp will not leave jalna lok sabha constituency to anyone | Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही!

Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही!

Next

जालना: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, ऑगस्टमध्ये ठाकरे-पिता पुत्र राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुन्हा एकदा संघटना मजबूत करून पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. मात्र, एकावर एक धक्के ठाकरेंना बसत असून, शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिंदे गटाला पाठिंबा देत मोठा झटका दिला. दुसरीकडे खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेश भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासाठीही एक धक्का असल्याचे सांगितले जात आहे. 

खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताना आपल्यावर दबाव आहे. संकटे येतात त्यावेळी माणूस सेफ होण्याचा प्रयत्न करतो, असे सूचक विधान खोतकरांनी केले. खोतकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात होतं. आता खुद्द खोतकर यांनी दबाव असल्याचे सांगितले आहे. अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. आता खोतकर शिंदे गटात आले आहेत. राज्यात शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. सरकारला भाजपचा पाठिंबा आहे. त्यामुळे खोतकरांना लोकसभा निवडणूक लढवायची असल्यास भाजपला मतदारसंघ सोडावा लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

भाजप आपला मतदारसंघ सोडणार नाही

आम्ही ही जमीन वखरली, नांगरली, तिथे पेरणी केली. आता तिथून सगळा माल निघत असताना आम्ही तिथे कोणाला पाय ठेऊ देणार नाही. हा मतदारसंघ भाजपचा आहे. ती रावसाहेब दानवेंच्या बापाची जहागीर नाही. इथे हरिभाऊ उभे राहतील किंवा दुसरे कोणीतरी निवडणूक लढवेल. पण भाजप आपला मतदारसंघ सोडणार नाही. आम्ही ४५ वर्षे हा मतदारसंघ ताब्यात ठेवला नाही. तो दुसऱ्या पक्षाला देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी स्पष्ट भूमिका दानवेंनी मांडली. तत्पूर्वी, जालना लोकसभा मतदारसंघातून नऊवेळा भाजपचा विजय झाला. पाचवेळा रावसाहेब दानवे, प्रत्येकी दोनवेळा उत्तमसिंह पवार आणि पुंडलिकराव दानवे इथून विजयी झालेत.

दरम्यान, माझ्याबद्दल काही तपास सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझ्या मतदारसंघातील कामे प्रलंबित आहे. अडचणीत असलेला माणूस आधार शोधतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यानंतर अडचण असेल तर तू निर्णय घेऊ शकतोस असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत असल्याचे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर केले. 
 

Web Title: union minister raosaheb danve make it clear to eknath shinde group bjp will not leave jalna lok sabha constituency to anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.