वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 04:33 PM2017-08-27T16:33:04+5:302017-08-27T16:35:17+5:30
पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पुणे, दि. 27 - पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.
वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. विकासकामांसाठी निधी मोठयप्रमाणात उपलब्ध आहे, मात्र अधिकारी वेळेवर काम करीत नसल्याने काम रखडत असल्याची नाराजी ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून 6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना, शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. सिंगापूरच्या धर्तीवर नगर नियोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.