मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 04:24 PM2022-12-29T16:24:51+5:302022-12-29T16:40:26+5:30

Uddhav Thackeray : शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्याने ठाकरे गट आक्रमक झालेला असताना उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे. 

Unionizing Mumbai is BJP's ploy, Uddhav Thackeray slams BJP and Eknath Shinde | मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी केली. यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी ही भाजप नेत्यांनी केली आहे. मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव आहे. मुंबई भाजपच्या हातात गेली तर घात कसा करणार, हे समोर आले आहे.  मुंबई आजपर्यंत कोणामुळे सुरक्षित आहे, हे मुंबईकरांना माहीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलने केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचे काम करणार का हा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.याचबरोबर, शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्याने ठाकरे गट आक्रमक झालेला असताना उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्मृतिमंदिराला भेट दिली. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. "स्वत:मध्ये काही करण्याची धमक नाही याची कल्पना ज्याला असते, तो असे चोऱ्यामाऱ्या आणि दुसऱ्याचे ओरबाडण्याचे काम करतो. पक्ष चोरायचा, नेते चोरायचे हे असले काम तेच लोक करतात. काल मिंधे गट मुंबई पालिकेत पक्ष कार्यालयावर दावा करायला गेला. RSS च्या कार्यालयात गेलेत मग आता त्या कार्यालयावरही दावा करणार का? आता सरसंघचालक मोहन भागवतांनी कार्यालयाचे कोपरे तपासून पाहावेत कारण, जे भेट घ्यायला आले होते ते कुठं लिंबू-मिरच्या-टाचण्या टाकून तर गेले नाहीत ना", असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. 

Web Title: Unionizing Mumbai is BJP's ploy, Uddhav Thackeray slams BJP and Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.