मुस्लिम भक्तांची अनोखी 'देवी' आराधना

By admin | Published: October 8, 2016 09:28 PM2016-10-08T21:28:40+5:302016-10-08T21:28:40+5:30

मोहोळ येथे एक निस्सीम भक्तीचे उदहारण येथील मुस्लिम कुटुंबाने एक आदर्श म्हणून ठेवले आहे

The unique 'Goddess' worship of Muslim devotees | मुस्लिम भक्तांची अनोखी 'देवी' आराधना

मुस्लिम भक्तांची अनोखी 'देवी' आराधना

Next
>महेश कोटिवाले / ऑनलाइन लोकमत
वडवळ, दि. 8 - देव भक्तिचा भुकेला असतो त्याला प्रिय असते ती भक्ताची निस्सीम भक्ति मग तो कोणीही असो ..वडवळ ता. मोहोळ येथे असाच एक निस्सीम भक्तीचे उदहारण येथील मुस्लिम कुटुंबाने एक आदर्श म्हणून ठेवले आहे.येथील सार्वजानिक नवरात्र उत्सव मंडळ मधील देवीची मनोभावे ते पूजा अर्चा तर करतात च सर्व रिवाज हिंदू कुटुंबा प्रमाणे पाळतात.
महम्मद तांबोळी व त्यांचे कुटुंबिय हे गेल्या तिन पिढीपासून ही सेवा करीत असून प्रत्येक नवरात्र उत्सवत ते अर्धा ग्राम सोने देवीस अर्पण करतात श्री नागनाथ मंदिर समोर मस्जिद असून या मस्जिद समोर च या देवीची स्थापना केलि जाते.हे मुस्लिम कुटुंब नागनाथ चे देखील भक्त असून मस्जिद मधे देखील नित्य नमाज अदा करतात गावातील सर्व ग्रामस्था प्रमाणे ते नागनाथ यात्रा व नवरात्र उत्सव मधे सर्व रीती रिवाज श्रद्धेने पार पाडतात.
हमीद तांबोळी याविषयी बोलताना म्हणाला"माझे आजोबा अमिन ताम्बोलि यांच्यापासुन ही सेवा सुरु आहे माझे वडील महम्मद आई रेहाना भाऊ तय्यब या सर्वाना देवीची आराधना करण्यात समाधान मिळते असे सांगितले मंदिर समोर असलेल्या घरासमोर च किरकोळ खेळणी ,वस्तु आदिचि विक्री करुन हे कुटुंब चरितार्थ चलवित असले या अनोख्या भक्ति तुन मात्र त्यांनी आपल्या मनाची श्रीमंति मात्र दाखवली आहे
सार्वजानिक नवरात्र उत्सव मंडळ चे अध्यक्ष भीमराव चव्हाण,उपाध्यक्ष चंद्रकांत शिवपूजे,सचिव शाहिर गुंड,पोपट भंडारे,किसन लांडे,दत्तात्रय पडवळकर,दत्तात्रय कदम ,विठ्ठल चव्हाण,दऱ्याबा माने,कमलाकर नरळे या देवीभक्तानि या नवरात्र उत्सव मंडळ ची स्थापना केलि असून ते सर्व या ताम्बोलि कुटुंबियांच्या श्रद्धेला तोड़ नाही असेच सांगतात.
 
"गावातील सर्व हिन्दू मुस्लिम यांचे सण एकत्रित करण्याची प्रथाच येथे आहे नागनाथ यात्रेत देखील अगोदर शेख नसरुद्दीन बादशहा यांचे नाव अगोदर घेवून नंतर हर हर महादेव असे म्हंटले जाते त्यामुळे येथील धार्मिक वातावरण मधे भाईचारा आहे"
-चंद्रकांत शिवपूजे, उपाध्यक्ष-सार्वजानिक नवरात्र उत्सव मंडळ
 
"आज आमची तीसरी पिढी या देवीची आराधना करीत आहे मनापासून केलेली भक्ति सर्व समाधान देते  त्यामुळे देव कोणता यापेक्षा आमची भक्ति कशी आहे हे महत्वाचे आहे आम्ही ही परंपरा अशीच पुढे देखील चालू ठेवू"
- हमीद तांबोळी.
 

Web Title: The unique 'Goddess' worship of Muslim devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.