स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी अनोखा उपक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 06:19 PM2017-01-04T18:19:41+5:302017-01-04T18:19:41+5:30

सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला ३ जानेवारीपासून सुरूवात झाली असून, या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.

Unique initiative to welcome birth control! | स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी अनोखा उपक्रम!

स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी अनोखा उपक्रम!

Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 4 -  सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवाला ३ जानेवारीपासून सुरूवात झाली असून,  या दरम्यान अभिनंदन पत्र व मिठाई देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.
पूर्वीच्या तुलनेत आता महिला बऱ्यापैकी यशाची शिखरे गाठत आहेत. मात्र, पुरूषांच्या तुलनेत स्त्री जन्मदराचे प्रमाण कमी असल्याने पुरूष-स्त्री लिंगगुणोत्तरात तफावत निर्माण होत आहे. तफावतीची ही दरी कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान सुरू केले असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. स्त्री लिंगगुणोत्तराचे प्रमाण वाढविणे आणि मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाने स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बालिका दिनाचे औचित्य तसेच सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त आरोग्य केंद्रात जाऊन स्त्री जन्माचे स्वागत, मातांचे अभिनंदन  केले जात आहे. ३ व ४ जानेवारीला जिल्हा सामान्य रुग्णालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Unique initiative to welcome birth control!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.