आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

By admin | Published: July 1, 2014 12:00 AM2014-07-01T00:00:40+5:302014-07-01T00:00:40+5:30

‘वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले.

Unique 'Liverpool' connected to the mother | आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

Next
>पुणो : ‘वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले.  यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणा:या आईचे प्राण वाचविले. पुण्यातील ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उपचारानंतर दोघांचीही प्रकृती उत्तम असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 
ग्लोबल रुग्णालयातील यकृत तज्ज्ञ डॉ. मोहंमद रेला, डॉ. हेमंत वडेयार, समीर शाह यांनी अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. वडेयार म्हणाले, की 49 वर्षाच्या गुणवंती गुंदेशा यांना त्रस होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांचे यकृत निकामी झाल्याचे दिसून आले. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर पडत 
होता. त्यांची प्रकृती चिंताजनक 
झाली होती. तातडीने यकृत प्रत्यारोपण करणो गरजेचे होते. त्यासाठी यकृत हवे असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. ते ऐकताच गुंदेशा यांची धवल आणि धीरज ही दोन्ही मुले यकृत दान करण्यासाठी पुढे आली. डॉक्टरांनी तातडीने दोघांच्या तपासण्या करून कोणाचे यकृत मॅच होत आहे, हे पाहिले. 
यामध्ये गुंदेशा यांचा लहान मुलगा धीरज याचे यकृत मॅच होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने तातडीने यकृत दान करण्याचा 
निर्णय घेतला. लगेचच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केल्या. तब्बल 12 
तास शस्त्रक्रिया करून धीरजचे 
अध्रे यकृत काढले आणि गुंदेशा 
यांचे खराब झालेले यकृत काढून त्याठिकाणी धीरजच्या यकृताचे प्रत्यारोपण केले. गुंतागुंतीची 
ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)
 
4यकृत हा अवयव काही प्रमाणात काढल्यानंतरही तो काही महिन्यांमध्ये पूर्णपणो वाढतो. गुंदेशा आणि त्यांचा मुलगा या दोघांच्या यकृताची वाढ होत असून, लवकरच ते नॉर्मल आकाराचे होतील, असेही डॉ. वडेयार यांनी सांगितले.

Web Title: Unique 'Liverpool' connected to the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.