अनोखे रक्षाबंधन - भावाने बहिणीला दिली रेडीमेड शौचालयाची भेट
By admin | Published: August 18, 2016 06:22 PM2016-08-18T18:22:40+5:302016-08-18T18:22:40+5:30
घरी शौचालय नसल्याने बहिणीला उघड्यावर शौचास जावे लागण्याची बाब भावाला बोचत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी एका भावाने बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी रेडिमेड शौचालयाची अनोखी भेट दिली
संतोष वानखडे /ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 18 - घरी शौचालय नसल्याने बहिणीला उघड्यावर शौचास जावे लागण्याची बाब भावाला बोचत होती. हा प्रकार थांबविण्यासाठी एका भावाने बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी रेडिमेड शौचालयाची अनोखी भेट दिली आहे. गणेश खंंडाळकर असे भावाचे नाव असून, देऊळगाव साकर्शा येथील सुनिता नांदेडकर नामक बहिणीला त्यांनी शौचालय दिले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घरोघरी शौचालय बांधकाम करण्याचा नारा दिला जात आहे. या मिशनअंतर्गत पात्र लाभार्थीला १२ हजार रुपयाचे अनुदानही दिले जाते. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा येथील सुनिता नांदेडकर यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसल्याने कुटुंबियांना उघड्यावरच शौचास जावे लागत होते.
ही बाब भाऊ गणेश खंडाळकर यांना चांगलीच बोचत असल्याने त्यांनी रक्षाबंधनाला सुनिताला रेडिमेड शौचालय देण्याचा संकल्प केला. खंडाळकर हे मूळचे वाशिम येथील रहिवासी असून, ते रिसोड पंचायत समिती येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कक्षात सहायक कार्यक्रम अधिकारी आहेत. १८ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाला बहिणीच्या घरी जाऊन खंडाळकर यांनी शौचालयाची अनोखी भेट दिली.