अंधांना दृष्टी देण्याचा अनोखा संकल्प

By admin | Published: February 9, 2015 05:00 AM2015-02-09T05:00:30+5:302015-02-09T05:00:30+5:30

अंधांच्या जीवनात प्रकाशाची वाट तयार व्हावी. त्यांना नव्या दृष्टीतून हे विश्व पाहता यावे, यासाठी तालुक्यातील देवीभोयरे येथील प्राथमिक शिक्षक संतोष अटक यांनी नेत्रदान चळवळीचा ध्यास घेतला आहे़

A unique resolution of sighting the eyes | अंधांना दृष्टी देण्याचा अनोखा संकल्प

अंधांना दृष्टी देण्याचा अनोखा संकल्प

Next

विनोद गोळे, पारनेर (अहमदनगर)
अंधांच्या जीवनात प्रकाशाची वाट तयार व्हावी. त्यांना नव्या दृष्टीतून हे विश्व पाहता यावे, यासाठी तालुक्यातील देवीभोयरे येथील प्राथमिक शिक्षक संतोष अटक यांनी नेत्रदान चळवळीचा ध्यास घेतला आहे़
अटक यांच्या चळवळीला प्रतिसाद देत मागील ४ वर्षांत १८० जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे़ शिक्षकीपेशाबरोबरच अटक यांनी समाजसेवेचे हे व्रत ४ वर्षांपासून अविरत सुरू ठेवले आहे़ देवीभोयरे येथील देवीच्या मंदिरात एक अंध व्यक्ती भेटल्यानंतर त्यांनी त्याची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व पत्नी अश्विनीचा नेत्रदानाचा अर्ज भरून चळवळीचा श्रीगणेशा केला. यातूनच व्यंकटराव अवधूत यांच्या पथकाने जागरण गोंधळाद्वारे नेत्रदानाबाबत प्रबोधनाचा निर्णय घेतला.

Web Title: A unique resolution of sighting the eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.