नव्या सिटी टॅक्सीविरोधात एकजूट

By Admin | Published: November 4, 2016 12:57 AM2016-11-04T00:57:51+5:302016-11-04T00:57:51+5:30

महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़

Unite against new city taxi | नव्या सिटी टॅक्सीविरोधात एकजूट

नव्या सिटी टॅक्सीविरोधात एकजूट

googlenewsNext


पुणे : अखिल भारतीय पर्यटक परवान्यावर धावणाऱ्या कंपन्यांच्या टॅक्सींना अधिकृत करणाऱ्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या नवीन महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम २०१६ च्या मसुद्याला एकजुटीने विरोध करण्याचा निर्धार गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़ त्यातील पहिले पाऊल म्हणून या मसुद्याला विरोध करणाऱ्या हरकती परिवहन आयुक्तांकडे हरकती नोंदविण्याचे या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले़
पुण्यातील रिक्षा पंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी झालेल्या या बैठकीला रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ़ बाबा आढाव, एसटीकामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, पुणे पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, निरुउद्दीन इनामदार, ट्रॅक्सी युनियनचे अध्यक्ष शिवाजी खांदवे, मोटार वाहन अधिनियमविषयक तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम, रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़
शासनाने जाहीर केलेला अधिनियमांचा मसुदा म्हणजे रिक्षांसह टॅक्सी, शहरी बस व राज्य परिवहन महामंडळ या सार्वजनिक वाहतूक देणाऱ्यांना संपविण्याचा बेत आहे़ खासगी कंपन्यांना तकलादू नियमांची चौकट तयार करून त्यांना अधिकृत करून घ्यायचे, असे पद्धतशीर षड्यंत्र रचले आहे़ शहरी प्रवासी वाहतुकीसाठी शहर परिवहन सेवेतील कर्मचारी यांची अवस्था आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसारखी होणे अपरिहार्य आहे़ या मसुद्यास हरकत नोंदवूनही तो अंतिम झाल्यास सर्व सार्वजनिक परिवहन सेवा ही अस्तित्वाची लढाई समजून एकजुटीने त्याला विरोध करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला़
त्यातील पहिले पाऊस म्हणून सर्व संघटना व त्यांच्या सदस्यांनी परिवहन आयुक्तांकडे या मसुद्यावर हरकती नोंदविण्यात येणार आहे़ याविषयी शासनाला एकजूट दाखविण्यासाठी रिक्षा, टॅक्सी, पीएमपी व एसटी या चार प्रमुख घटकांची या महिनाभरात डॉ़ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले़
शासनाकडून रिक्षा, टॅक्सीचालकांना ते सुशिक्षित बेरोजगार आहेत म्हणून परवाना दिला जातो़ त्यांच्या रोजगारावर या अधिनियमामुळे अतिक्रमण होणार असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
>शासनाचा या मसुद्यातील काही तरतुदी भारतीय संविधानाच्या विरोधात तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीच्या विरोधात असल्याचे मत मोटार वाहननियमातील तज्ज्ञ अ‍ॅड़ पी़ बी़ शाळिग्राम यांनी या वेळी सांगितले़

Web Title: Unite against new city taxi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.