विद्यापीठाचे परिपत्रक : अनुपस्थित विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 04:33 AM2018-01-05T04:33:00+5:302018-01-05T04:34:09+5:30
महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते.
मुंबई - महाराष्ट्र बंदमध्ये बुधवारी, ३ जानेवारीला परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची ६ जानेवारीला विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने गुरूवारी जाहीर केला आहे. बंददरम्यान झालेल्या रास्ता रोको आणि रेल रोकोमुळे बहुतेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहचता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांसाठी हीविशेष परीक्षा होणार असून परीक्षेची वेळ आणि ठिकाण यामध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे परिपत्रक विद्यापीठाने निर्गमित केले आहे.
संबंधित परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली. ३ जानेवारीला सकाळच्या सत्रात ४ परीक्षा, तर दुपारच्या सत्रात ९ अशा एकुण १३ परीक्षांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये सकाळच्या सत्रात तृतीय वर्ष बीकॉम (आयडॉल), एमएस्सी फॉरेन्सिक सायन्स (सत्र १), एमएस्सी पार्ट-२ आणि एमसीए (आयडॉल) सत्र-२ या परीक्षांचे आयोजन केले होते.
दुपारच्या सत्रात म्हणजेच ३ वाजता सुरू होणाºया परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बीए (वार्षिक), एमएड (स्पेशल एज्युकेशन) (हीअरिंग इम्पेअरड) सत्र-१, एम.ए. पार्ट-१, पार्ट-२ (वार्षिक), बीकॉम सत्र-६, एम.कॉम (पार्ट-एक) वार्षिक, तृतीय वर्ष बीएस्सी (वार्षिक) (आयडॉल), बीएस्सी (आयटी) सत्र-पाच, एमसीए (सत्र-४) (आयडॉल) आणि द्वितीय एलएलबी/सामान्य एलएलबी(सत्र-३) (तीन वर्षीय अभ्यासक्रम) चतुर्थ वर्ष एलएलबी( पाच वर्षीय अभ्यासक्रम) (सत्र -७) या परीक्षांचा समावेश होता.
वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या परीक्षांच्या वेळेत आणि ठिकाणांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
वाहतुकीच्या व अन्य कारणांमुळे या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत या परीक्षा आता ६ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले आहे.