नवा अभ्यासक्रम विद्यापीठास बंधनकारक नाही- डॉ. अनिल पाटील
By admin | Published: June 15, 2016 07:02 PM2016-06-15T19:02:04+5:302016-06-15T19:02:04+5:30
विद्यापीठ अनुदान मंडळ नव्या अभ्यासक्रमाबाबत सूचना करू शकते. परंतु ते विद्यापीठास बंधनकारक नाही
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - विद्यापीठ अनुदान मंडळ नव्या अभ्यासक्रमाबाबत सूचना करू शकते. परंतु ते विद्यापीठास बंधनकारक नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. अनिल पाटील यांनी दिली आहे.
अलिकडेच विद्यापीठ अनुदान मंडळाने (युजीसी) विद्यापीठांना शहर विकासविषयक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सूचित केले करून, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर तो अंमलात आणण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाची भूमिका जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता, डॉ. पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, अद्यापपर्यंत याबाबतची कोणतीही सूचना मुंबई विद्यापीठास आलेली नाही. त्याचबरोबर मुळात मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यान्वये चालते. त्याच कायद्यान्वये विद्यापीठास स्वायत्तता प्राप्त आहे. विद्यापीठ अनुदान मंडळ अभ्यासक्रमाबाबत कोणतेही बंधन विद्यापीठावर आणू शकत नाही, असेही त्यांनी अखेरीस स्पष्ट केले.
परिणामी विद्यापीठ अनुदान मंडळाने विद्यापीठांना शहर विकास विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यास सूचित केले. म्हणजे ते विद्यापीठांमध्ये सुरू होणार, अशी परिस्थिती नसल्याचे यांतून स्पष्ट झाले आहे.