शुक्रवारी विद्यापीठाने लावले फक्त १४ निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 04:16 AM2017-08-05T04:16:09+5:302017-08-05T04:16:15+5:30
मुंबई विद्यापीठाची ३१ जुलैची डेडलाइन चुकल्यावर, पहिल्याच दिवशी विद्यापीठाने निकालांचा धडाका लावला होता, पण आता गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाचे काम कासव गतीने सुरू आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाची ३१ जुलैची डेडलाइन चुकल्यावर, पहिल्याच दिवशी विद्यापीठाने निकालांचा धडाका लावला होता, पण आता गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाचे काम कासव गतीने सुरू आहे. शुक्रवारी दिवसभरात विद्यापीठाने फक्त १४ निकाल जाहीर केले आहेत.
आतापर्यंत फक्त २५४ निकाल लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे. २२३ निकाल जाहीर करणे बाकी आहे. विधि आणि वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहे. त्यामुळे हे निकाल कधी लागणार? याकडेच विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान परीक्षा भवनाशेजारील गरवारे इन्स्टिट्युटने शुक्रवारी पूजेचे आयोजन करून दिवसभर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावला. यामुळे पेपर तपासणीत व्यत्यय आल्याची चर्चाही रंगली होती.