मुंबई विद्यापीठाला देशभरात पसंती
By admin | Published: August 5, 2014 12:56 AM2014-08-05T00:56:33+5:302014-08-05T00:56:33+5:30
बारावीनंतर मुंबईमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Next
तेजस वाघमारे - मुंबई
बारावीनंतर मुंबईमध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी देशभरातून सुमारे 44 हजार 931 विद्याथ्र्यानी विद्यापीठाकडे ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी केली आहे. यामधील बहुतांश विद्याथ्र्यानी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. राज्याबाहेरून येणा:या विद्याथ्र्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 8 हजार 531 विद्यार्थी राजस्थानमधील आहेत. त्याखालोखाल 6 हजार 846 विद्यार्थी उत्तर प्रदेश आणि तिस:या क्रमांकावर गुजरातमधील 6 हजार 655 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी अर्ज केले आहेत.
यंदा राज्यात बारावीचा विक्रमी निकाल लागला. प्रवेशापासून एकाही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या 15 आणि सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाच्या 20 टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. राज्यातील विद्याथ्र्यामध्ये प्रवेशासाठी स्पर्धा लागली असताना देशभरातून मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी येणा:या विद्याथ्र्याचीही संख्या अधिक आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यापीठाकडे ऑनलाइन प्रवेश पूर्व नोंदणी करणो विद्यापीठाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार प्रवेशापूर्वी विद्यार्थी विद्यापीठाकडे नोंदणी करीत आहेत.
बारावी निकालानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाने सरूकेली. विद्यापीठाकडे राज्यनिहाय विद्याथ्र्याची नोंदणी झाली असून, यामध्ये राजस्थानमधील 8 हजार 531 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठाला पसंती दर्शविली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील 6 हजार 846 विद्याथ्र्याचा समावेश आहे. गुजरातमधून 6 हजार 655 विद्याथ्र्यानी मुंबई विद्यापीठाला पसंती दर्शविली आहे. तसेच दिल्लीमधून 4 हजार 537, मध्य प्रदेशमधील 4 हजार 326 विद्याथ्र्यानी विद्यापीठाकडे नोंदणी केली आहे.
त्रिपुरामधून केवळ 8 विद्याथ्र्यानी विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पाँडेचरी 29, नागालँड 36, मिझोराम 20 आणि अरुणाचल प्रदेशमधील 38 विद्याथ्र्यानी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. राज्यातील 7 लाख 10 हजार 447 विद्याथ्र्यानी प्रवेश अर्ज भरले होते. विद्यापीठाकडे प्रवेशासाठी एकूण 7 लाख 55 हजार 431 विद्याथ्र्यानी अर्ज केले आहेत. (प्रतिनिधी)
अंदमान आणि निकोबार : 14
आंध्र प्रदेश : 1186
अरुणाचल प्रदेश : 38
आसाम : 853
बिहार : 1,110
चंदिगढ : 1,564
दादरा आणि नगर हवेली : 213
दमण आणि दीव : 140
दिल्ली : 4,537
गोवा : 251
गुजरात : 6, 655
हरियाणा : 1,108
हिमाचल प्रदेश : 175
जम्मू आणि काश्मीर : 129
झारखंड : 1006
कर्नाटक : 842
केरळ : 891
मध्य प्रदेश : 4,326
मणिपूर : 110
मेघालय : 120
मिझोराम : 20
नागालॅण्ड : 36
ओरिसा : 395
पाँडिचेरी : 29
पंजाब : 405
राजस्थान : 8,531
सिक्कीम : 36
तामिळनाडू : 806
त्रिपुरा : 08
उत्तर प्रदेश : 6,846
उत्तराखंड : 1, 215
पश्चिम बंगाल : 1,389