विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रही गाजवावे

By admin | Published: September 17, 2015 11:51 PM2015-09-17T23:51:29+5:302015-09-18T00:02:40+5:30

वीरेंद्र भांडारकर : शहाजी महाविद्यालयाने पटकविली ‘क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’

The University should also play the field of sports | विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रही गाजवावे

विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रही गाजवावे

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची क्रीडा संस्कृती, सुविधा उत्तम आहेत. विद्यापीठाने खेळाडूंच्या विकासाच्यादृष्टीने उपक्रम राबवून देशाच्या क्रीडा क्षेत्रात अव्वल स्थानी पोहोचावे, असे प्रतिपादन भारतीय खेळ प्राधिकरणाचे औरंगाबाद विभागाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी बुधवारी येथे केले. सर्वाधिक गुणांच्या जोरावर सलग तिसऱ्या वर्षी शहाजी महाविद्यालयाने ‘क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ पटकाविली.विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित ‘सन २०१३ व २०१४’ मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषा भवनातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.भांडारकर म्हणाले, अन्य विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विषयक सुविधा चांगल्या आहेत. खेळाडूंना अधिक चांगले मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ देऊन देशात अव्वल स्थानी विद्यापीठाने पोहोचावे. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते शहाजी महाविद्यालयाच्या संघाला ‘क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ प्रदान करण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते. क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. एस. हुंसवाडकर यांनी सायटेशन सर्टिफिकेटचे वाचन केले. विजय रोकडे व दीपक डांगे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एस. माळी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप---विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या खेळाडू तसेच संघव्यवस्थापक, प्रशिक्षकांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, ब्लेझर व शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. यात व्ही. व्ही सुपुगडे, एस. ए. पवार, एस. बी. पाटील, विजय रोकडे, एन. एम. भैराट, पी. बी. पाटील, सी. एस. गिरी, डी. पी. डचाले, एस. ए. खराडे, एम. एस. सूर्यवंशी, एम. आर. पाटील, एस. एस. माळी, जे. एन. तांबोळी, अक्षय शिर्के, एकता शिर्के, रूपविकास घाग, उत्तम मेंगाणे, अमित निंबाळकर, ऋतुराज जाधव, सुनील कोनवडेकर, अजिंक्य चौगले, अजिंक्य रेडेकर, सुधाकर पाटील, वर्षा मोरे, प्रियांका मोरे, तेजस्विनी मोरे, गायत्री धर्माधिकारी, प्रियांका पन्हाळकर, मितेश कुंटे, प्रियांका मोरे, वर्षा मोरे, अक्षय निगडे, शुभम् फडके, महेंद्र कांदरे, सायली दरेकर, प्रणिता कोळी, तेजल पाटील, स्नेहल लाड, निशिगंधा शहापूरकर, प्रशांत शेळके, प्रणव सोनटक्के, विजय हजारे, प्रीतम चौगुले, नीलेश पाटील, रमेश सावंत, दीपक माने, राजू हक्के, रोहित कांबळे, सुरेश सावंत, प्रशांत थोरात, स्वप्निल यादव यांचा समावेश होता.

खेळाडूंना दोन लाख
जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत विद्यापीठातर्फे करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी जाहीर केले. ते म्हणाले, विद्यापीठातील क्रीडा सुविधांचा उपयोग करून खेळाडूंनी स्वविकास साधावा तसेच त्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक करावा.

Web Title: The University should also play the field of sports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.