300 रुपयांत मेट्रोचा आठवडाभर ‘अनलिमिटेड’ प्रवास

By admin | Published: August 14, 2014 10:06 AM2014-08-14T10:06:02+5:302014-08-14T10:06:02+5:30

प्रवाशांना एका आठवडय़ात ‘अनलिमिटेड’ प्रवास फे-या करण्याची नवीन योजना आखण्यात आली असून त्यासाठी 300 रुपये आकारणी केली जाणार आहे.

'Unlimited' migration of Metro for Rs 300 to week 'unlimited' | 300 रुपयांत मेट्रोचा आठवडाभर ‘अनलिमिटेड’ प्रवास

300 रुपयांत मेट्रोचा आठवडाभर ‘अनलिमिटेड’ प्रवास

Next
>मुंबई : मुंबई मेट्रोला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच प्रवासीसंख्या आणि उत्पन्न आणखी वाढवण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून नवनव्या शक्कल लढवल्या जात आहेत. प्रवाशांना एका आठवडय़ात ‘अनलिमिटेड’ प्रवास फे-या (पाहिजे तेवढा प्रवास) करण्याची नवीन योजना आखण्यात आली असून त्यासाठी 300 रुपये आकारणी केली जाणार आहे. 15 ऑगस्टपासून त्याची सुरुवात केली जाणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा धावणा:या मेट्रोतून दिवसाला 5 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. टोकन, स्मार्ट कार्ड, वायफाय आणि तिकीटसेवेत सुविधा दिल्या जात असतानाच आता अनलिमिटेड प्रवास फे:यांची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी एक ‘फ्रीडम पास’ दिला जाणार असून त्याची किंमत ही 300 रुपये असेल. सध्या स्मार्ट कार्ड पासधारकांसाठी हा 
पास 300 रुपयांत मिळेल, तर नवीन 
फ्रीडम पास घेणा:या प्रवाशांना 350 रुपयांत हा पास मिळेल. 50 रुपये ही डिपॉङिाट म्हणून आकारणी केली जाईल, जे रिफंडेबल असतील.  (प्रतिनिधी)
 
महिलांना खूशखबर
मेट्रो प्रशासनाकडून महिलांसाठी खूशखबर देण्यात आली आहे. सध्या 4 डब्यांत मिळून महिला प्रवाशांसाठी आसनक्षमता 24 एवढी असून ती आता 32 केली जाणार आहे.  

Web Title: 'Unlimited' migration of Metro for Rs 300 to week 'unlimited'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.