Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:19 PM2020-06-19T16:19:36+5:302020-06-19T16:39:11+5:30

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंपनी या कार्यालयांमध्ये सामाजिक अंतर प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहे.

Unlock 1.0: Commencement of registration of driving license vehicles in the state | Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

Unlock 1.0:  राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स अन् वाहन नोंदणीच्या कामाला सुरुवात

Next

मुंबईः महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने वाहनांची नोंदणी आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचे काम कालपासून सुरू केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून 16 जून 2020 रोजी राज्यातील 50 कार्यालयांमध्ये वाहन चालविण्याचा परवाना, दुय्यम परवाना, वाहन नोंदणी व हस्तांतरण सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यात वाहन चालविण्याचा परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स) समाविष्ट आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरूपात हे विभाग बंद करण्यात आले होते आणि आता तीन महिन्यांनंतर ते पुन्हा सुरू होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कंपनी या कार्यालयांमध्ये सामाजिक अंतर प्रोटोकॉलचा अवलंब करीत आहे.

नवीन प्रोटोकॉल अंतर्गत लोक आरटीओ कार्यालयात अगोदरच अपॉइंटमेंट घेऊन येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना आरटीओच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. प्रत्येक दिवशी ठरावीक लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, कार्यालयात उपलब्ध अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामासाठी कोटा निश्चित केला जावा. जे आरटीओ सेंटर लर्नर परवान्यासाठी येत आहेत, त्यांच्यासाठी ६ फूट अंतर आणि संगणक, कीबोर्ड प्रत्येक वेळी वापरल्यानंतर सॅनिटाइज करणे बंधनकारक राहणार आहे.

सर्व अर्जदारांनी फेस मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालून कार्यालयात यावे आणि या कार्यालयांमध्ये सॅनिटायझर प्रदान करणे देखील आवश्यक आहे. कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करणारे उमेदवार केवळ सॅनिटायझरनंतरच वाहनात प्रवेश करतील. लॉकडाऊनपूर्वी लर्निंग लायसन्ससाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय फिटनेस नूतनीकरण प्रमाणपत्र सॅनिटायझर केल्यानंतरच दिले जाईल.

Read in English

Web Title: Unlock 1.0: Commencement of registration of driving license vehicles in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.