अतिवृष्टीने अभूतपूर्व संकट; शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही, पवारांची राज्य सरकारला सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:10 AM2020-10-20T01:10:12+5:302020-10-20T06:52:36+5:30

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, अनेक भागातील पिके पाण्यात आहेत. काही भागात तर जमिनीच खरवडून गेल्या आहेत. ()

Unprecedented crisis due to heavy rains, there is need of loans to stand up Farmers says Pawar | अतिवृष्टीने अभूतपूर्व संकट; शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही, पवारांची राज्य सरकारला सूचना 

अतिवृष्टीने अभूतपूर्व संकट; शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी कर्जाशिवाय गत्यंतर नाही, पवारांची राज्य सरकारला सूचना 

Next


तुळजापूर - सध्या अतिवृष्टीने अभूतपूर्व संकट आले आहे. राज्य मोठ्या आर्थिक संकटातही आहे. तरी शेतकऱ्यांना उभं करण्यास नवे कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला केली.

उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, अनेक भागातील पिके पाण्यात आहेत. काही भागात तर जमिनीच खरवडून गेल्या आहेत. विहिरी, पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या स्थितीत केंद्राचीही मदत लागेल. एकट्या राज्याला हे पेलणारे नाही. यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत.

नुकसानीची पाहणी : नेते पोहोचले बांधावर, मदतीवरून राजकीय ‘गडगडाट’; आता आरोप-प्रत्यारोपांची अतिवृष्टी

पिकविम्याच्या निकषात, धोरणात अशा आपत्कालीन स्थितीसाठी शिथिलता हवी, हे त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत. केंद्राने पारित केलेल्या कृषी विधेयकावरही टिप्पणी करीत त्यातील धोका सांगितला. शेतमाल खरेदीत मोठ्या जागतिक कंपन्या उतरतील, आता चांगला भाव देतीलही. पण एकदा येथील व्यापारी झोपवले की मग ते म्हणतील त्या दराने माल द्यावा लागेल. यात एकाधिकारशाही सुरू होईल. म्हणून यास विरोध असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Unprecedented crisis due to heavy rains, there is need of loans to stand up Farmers says Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.