तीन महिन्यानंतर उकल :प्रियकराकडून विवाहिता प्रेयसीची हत्या

By Admin | Published: March 16, 2017 03:14 PM2017-03-16T15:14:43+5:302017-03-16T15:14:43+5:30

ज्योती पवार नामक विवाहितेचा मृतदेह असून तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Unravel after three months: The murder of a married woman from the beloved boyfriend | तीन महिन्यानंतर उकल :प्रियकराकडून विवाहिता प्रेयसीची हत्या

तीन महिन्यानंतर उकल :प्रियकराकडून विवाहिता प्रेयसीची हत्या

googlenewsNext

नाशिक : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वासाळी शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या एका अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. ज्योती पवार नामक विवाहितेचा मृतदेह असून तिची हत्त्या प्रियकराने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वासाळी शिवारातील एका डोंगराच्या निर्जन परिसरात १९ डिसेंबर रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. सदर मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये असल्याने पोलीसांचा संशय अधिक बळावला होता. महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तविला होता. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, उपआयुक्त श्रीकांत धीवरे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे यांनी चर्चा करुन तपासाला गती दिली. सदर महिलेच्या डोक्यावर व मानेवर धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना पंचनाम्यात निदर्शनास आले; मात्र संशयिताने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलेचा चेहरा जळालेला होता. यामुळे मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते.

गोपनिय माहितीच्या आधारे एका बेपत्ता झालेल्या माहिलेच्या आईकडे विचारपूस केल्यानंतर तिच्याकडून काही माहिती हाती आली. त्याआधारे पोलिसांनी तपासाला पुढे दिशा दिल्यानंतर महिलेचा एका मनिष गिरासे नावाच्या इसमासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांने गिरासेचा शोध घेत त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने प्रथम सदर महिलेसोबत त्याची कोणतीही ओळख नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी ‘खाक्या’ दाखविल्यानंतर ‘सुंदरी’च्या भीतीपोटी त्याने केलेला गुन्हा कबुल केल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. धारधार शस्त्राने खून करून गिरासे याने पेट्रोल टाकून महिलेचा मृतदेह पेटवून देत घटनास्थळावरुन पळ काढला होता, असे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Web Title: Unravel after three months: The murder of a married woman from the beloved boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.