सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता

By admin | Published: April 10, 2016 02:20 AM2016-04-10T02:20:53+5:302016-04-10T02:20:53+5:30

दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसह जनसामान्यांशी निगडित विविध प्रश्नांवर वृत्तपत्र व जाहीर सभा यांमधून आम्ही आमच्या भावना मांडतो, ती आमची आदळआपट नसून जनतेच्या भावना

Unrest in the public about the government | सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता

सरकारबद्दल जनतेत अस्वस्थता

Next

कोल्हापूर : दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसह जनसामान्यांशी निगडित विविध प्रश्नांवर वृत्तपत्र व जाहीर सभा यांमधून आम्ही आमच्या भावना मांडतो, ती आमची आदळआपट नसून जनतेच्या भावना असतात. पंधरा वर्षांची राजवट फेकून देत ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता दिली त्यांच्या मनात सरकारबद्दल अस्वस्थता आहे. याबाबत आपण दक्ष राहिलो नाहीतर आपणही नालायक ठरू, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सरकारला घरचा आहेर दिला. सदाशिवराव मंडलिक यांनी ज्या विश्वासाने संजय मंडलिक यांना आपल्याकडे सुपूर्त केले, त्यांचा विश्वासघात करणार नाही, त्यांची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हमीदवाडा (ता. कागल जि.कोल्हापूर ) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक पूर्णाकृती पुतळ््याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते.
सदाशिवराव मंडलिक यांच्या कार्याचे कौतुक करीत उद्धव ठाकरे म्हणाले, सदाशिवराव हे बंडखोर व्यक्तिमत्त्व होते. यशवंतराव चव्हाण यांनी कॉँग्रेस सोडल्यानंतर त्यांनाही सुनावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. इच्छाशक्तीच्या जोरावर एकटा माणूस दूधगंगेचे पाणी वेदगंगेत आणून परिसराचे नंदनवन करू शकतो, तर आपण सर्वजण एकत्र येऊन दुष्काळावर काम का करू शकत नाही? शेतकरी सरकारकडे भीक मागत नाहीत, त्यांच्या कष्टाचे पैसे मागतात. निसर्ग कोपतो त्यावेळी सरकारकडून अपेक्षा असतात. दुष्काळाच्या काळात राजर्षी शाहू यांनी घोड्यावरून खेडोपाडी फिरून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न केले होते. त्या शाहूंची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात आम्ही सगळी एकत्र येऊन काम का करू शकत नाही, असा सवालही ठाकरे केला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंडलिक यांनी साखर कारखानदारीबरोबर शेतकरी जगला पाहिजे हे तत्त्व जोपासले. त्याच तत्त्वाने राज्य सरकारची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून सरकारच्या चुका दाखविल्या. त्यांच्या सूचनांना सरकारमध्ये मानाचे स्थान असल्याचेही पाटील म्हणाले.
यावेळी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार राजू शेट्टी यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)

कोल्हापूरचे मंत्रिपद पक्के डोक्यात
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार आहेत त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी वक्त्यांनी केली. याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, कोल्हापूरला मंत्रिमंडळात कधी स्थान द्यायचे हे पक्कं डोक्यात ठेवल्याचे सांगितले.

उद्धव तुम्ही लढताय, पण सरकार हलेना
दुष्काळाच्या प्रश्नावर लढण्याचे काम उद्धव ठाकरे तुम्ही करीत आहात; परंतु तुमचं सरकार अजून हलेना, असा टोला आ. पतंगराव कदम यांनी यावेळी हाणला.

Web Title: Unrest in the public about the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.