सांस्कृतिक दहशतवाद अस्वस्थ करणारा
By admin | Published: December 21, 2015 12:28 AM2015-12-21T00:28:34+5:302015-12-21T00:28:34+5:30
‘सांस्कृतिक दहश्तवादाला कळत नकळत राज्यकर्त्यांकडून दिला जाणारा पाठिंबा अस्वस्थ करणारा आहे. पुरस्कार वापसीच्या माध्यमातून व्यक्त केली जाणारे तीव्र भावना
पुणे: ‘सांस्कृतिक दहश्तवादाला कळत नकळत राज्यकर्त्यांकडून दिला जाणारा पाठिंबा अस्वस्थ करणारा आहे. पुरस्कार वापसीच्या माध्यमातून व्यक्त केली जाणारे तीव्र भावना चुकीची नाही,असे मत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
प्रतिमा पब्लिकेशन्सतर्फे प्रा.फ.मुं. शिंदे यांच्या ‘फ. मुं. शिंदे समग्र कविता संग्रह खंड - 1’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवार व शिंदे यांची प्रा. मिलिंद जोशी यांनी मुलाखत घेतली. पिंपरी चिंचवड येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, लीला शिंदे , करण ग्रुपचे अध्यक्ष कल्याण तावरे, दीपक चांदणे,आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक दहशतवादावरील प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, कला हे माध्यम असून कलेच्या माध्यमातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जातो. बाजीराव मस्तानी चित्रपटाचे शो बंद पाडणे अयोग्य आहे. तुुम्हाला पसंत नाही तर तुम्ही पाहू नका. परंतु ,ज्यांना चित्रपट पहायचा आहे , त्यांना अडवू नका. एखाद्या कलाकृतीतील प्रत्येक मताशी आपण सहमत असूच असे होत नाही. त्यातच राज्याकर्त्यांकडून अशा गोष्टींना कळत नकळत पाठिंबा दिला जातो. ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे. घाशीराम कोतवाल नाटकाच्या वेळीही विरोध झाला होता. त्यामुळे मीच ते नाटक पाहण्यासाठी गेलो. पुढे ते नाटक जागतिक पातळीवर गेले.
पुरस्कार वापसीवर बोलताना पवार म्हणाले, ‘‘ राज्यकर्त्यांकडूनच केवळ पुरस्कार परत करून का तर पुरस्काराबरोबर देण्यात आलेली रक्कम व्याजासह परत करा,अशा प्रकारे सत्ताधा-यांकडून चमत्कारिक व्यक्तव्य केले जाते.त्यातून संबंधितांचा दृष्टीकोन लक्षात येतो. त्यामुळे ,समाजातून तीव्र मत व्यक्त केले तर त्यात चुकीचे काही नाही.’’
माझा मुळ विषय गणित होता. परंतु. परिस्थितीनुरूप गणित बदलत गेले ,असे सांगत फ.मुं.शिंदे म्हणाले, बहुतांश सर्व विद्यापीठांमध्ये माझ्या कविता अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी माझ्या साहित्यावर पीएच.डी.केली. तसेच माझ्या लिखाणाचेही नेहमी स्वागत केले आहे. निवडणुकीची आवड असल्याने मी अपक्ष उभा राहिलो. संधी मिळाली तर नकीच राजकीय क्षेत्रात काम करायला आवडेल.’’