अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 05:32 AM2023-03-24T05:32:08+5:302023-03-24T05:34:19+5:30

राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

Unseasonal impact: Application for compensation of one and a half lakh farmers, will it be discussed? | अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

अवकाळीचा तडाखा : सव्वादोन लाख शेतकऱ्यांचा भरपाईसाठी अर्ज, यावर चर्चा होणार का?

googlenewsNext

पुणे : राज्यात गेल्या पंधरवड्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे अर्ज केला आहे.
राज्यात होळीच्या काळात तसेच गेल्या आठवड्यात दोनवेळा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अनेक जिल्ह्यांमध्ये गहू, हरभरा काढणीला आला होता, तर काही शेतकऱ्यांच्या काढणीला केलेल्या पिकांवर पावसाचे पाणी फिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचा जमिनीवर सडा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जिल्हानिहाय स्थानिक आपत्तीसाठी अर्ज 
नगर १,१२६, नाशिक २१६, चंद्रपूर ११, कोल्हापूर १, जालना ११,८८२, गोंदिया ५, सोलापूर १,१९२, जळगाव ६१७, सातारा ४, छ. संभाजीनगर ६,८९५, भंडारा १३, वाशिम १,३४१, बुलढाणा ३,०२५, नंदुरबार १,७३३, सांगली ३०१, यवतमाळ १६,०१९, अमरावती १,८४८, गडचिरोली ७, धाराशिव ५,२२४, लातूर १३,७६४, परभणी ६,०१०, वर्धा ३४०, नागपूर ४०४, हिंगोली २,०८०, अकोला २,९१६, धुळे ३,६७०, पुणे ६७, नांदेड ५६,३३५, बीड २१,७६३, 
एकूण १,६०,८०९

जिल्ह्यानुसार काढणीपश्चात नुकसान अर्ज
नगर २१७, नाशिक ३४, चंद्रपूर २, जालना १,७७९, गोंदिया ८, सोलापूर १,६०७, जळगाव ४३७, सातारा ८, वर्धा १,७५६, बुलढाणा ३,९३४, नंदुरबार १६२, सांगली ३१, यवतमाळ १३,६९५, अमरावती १,६३०, गडचिरोली २९, धाराशिव ३,४२३, लातूर ८,९८५, परभणी ७,४६४, 
वर्धा १०१, नागपूर ११५, हिंगोली २,०८६, अकोला १,६२२, धुळे १६१, पुणे ८, बीड ४,७४१, 
एकूण ५६,७२२.

राज्यातून १ लाख ६० हजार ८०९ अर्ज विमा कंपन्यांकडे आले आहेत. नुकसानभरपाईचा अर्ज आल्यानंतर त्याचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ५ हजार २४१ अर्जदारांचे सर्वेक्षण झाले आहे, तर ५५ हजार ५६८ अर्जांचे सर्वेक्षण झालेेले नाही.

काढणीपश्चात नुकसान झालेल्यांमध्ये ५६ हजार ७२२ अर्ज आले आहेत. त्यापैकी २७ हजार ५२४ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, २९ हजार १९८ अर्जांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. यात सर्वाधिक १३ हजार ६९५ अर्ज यवतमाळमधून आले आहेत. त्याखालोखाल ८ हजार ९८५ अर्ज लातूरमधून आले आहेत.

उभ्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४०, ६०, ७५, ८५ व १०० टक्के भरपाई मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा. नुकसान झालेली बहुतेक पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई चांगली मिळणार आहे.
- विनयकुमार आवटे, 
मुख्य सांख्यिक, कृषी विभाग

Web Title: Unseasonal impact: Application for compensation of one and a half lakh farmers, will it be discussed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी