नको वंशाचा दिवा...जोडीदार ‘सुरक्षित’ हवा!
By Admin | Published: November 29, 2015 03:27 AM2015-11-29T03:27:09+5:302015-11-29T03:27:09+5:30
कळत-नकळत आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याचे समजल्यानंतरही केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून जोडीदाराला ‘एड्स’ची भेट दिली जात असल्याचे लक्षात येताच एड्स नियंत्रण
- जगदीश कोष्टी, सातारा
कळत-नकळत आपल्याला एचआयव्ही संसर्ग झाल्याचे समजल्यानंतरही केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून जोडीदाराला ‘एड्स’ची भेट दिली जात असल्याचे लक्षात येताच एड्स नियंत्रण विभागाने ‘आॅपरेशन शून्य’ ही मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर जिल्ह्यातील तब्बल ९६८ रुग्णांनी स्वत:हून आपल्या जोडीदाराला ‘सुरक्षित’ अंतरावर ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यात ८४२ पुरुष तर १२६ महिला आहेत.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या जनजागृतीमुळे समाजाने या रुग्णांना आपलेसे केले आहे. त्यामुळे एचआयव्हीचा प्रसार होणार नाही, याची काळजी घेण्याची खरी जबाबदारी संबंधित रुग्णावर येऊन ठेपत आहे.
जोडीदारातील एकालाच संसर्ग झाला आहे, अशा रुग्णांचा सर्व्हे झाला असून, सुमारे ९०० जोडपी आरोग्य विभागाने निवडली. आरोग्य कर्मचारी त्यांची भेट घेऊन ‘एचआयव्ही’बाबत त्यांचे प्रबोधन करून कुटुंबनियोजन साधनांचा वापर करण्यावर भर देण्यास सांगत आहेत.
‘डिसकॉरडंट कपल’
दोघांपैकी एकाला एड्सची बाधा झालेल्या जोडप्यांना आरोग्य विभाग ‘डिसकॉरडंट कपल’ म्हणून ओळखतो. अशा विवाहितांचा सर्व्हे झाला आहे. हे प्रमाण राज्यात 33%तर साताऱ्यात ४२ टक्के आहे.
रुग्ण सातारा जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित असून, त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण १० टक्के होते. हे प्रमाण ६ टक्क्यांवर आले आहे.
- डॉ. हेमंत भोसले,
प्रकल्प अधिकारी,
एड्स नियंत्रण विभाग, सातारा