Chitra Wagh-Uorfi Javed : “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:43 PM2023-01-10T13:43:28+5:302023-01-10T13:44:01+5:30

पुन्हा एकदा ट्वीट करत उर्फी जावेदनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

Uorfi Javed commeted on bjp leader chitra wagh twitter chitra tai meri khas hai targets social media | Chitra Wagh-Uorfi Javed : “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं

Chitra Wagh-Uorfi Javed : “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” उर्फी जावेदनं पुन्हा डिवचलं

googlenewsNext

अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. याला उर्फीने देखील उत्तर दिलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा ट्वीट करत उर्फी जावेदनंचित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

उर्फी जावेदनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पुन्हा एकदा चित्रा वाघ यांची खिल्ली उडवली आहे. “चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर में होने वाली सास है,” असं ट्वीट करत उर्फीनं चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. याशिवाय तिनं “उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं तू सास,” असंही ट्वीट करत खिल्ली उडवली.



यापूर्वीही केला डिवचण्याचा प्रयत्न
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं होतं. "मेरी DP इतनी ढासू, चित्रा मेरी सासू" असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील तिने चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss" असं म्हटलं होतं. तसेच उर्फीने याआधी "जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी जाहीर आव्हानही दिलं होतं.

Web Title: Uorfi Javed commeted on bjp leader chitra wagh twitter chitra tai meri khas hai targets social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.