Uorfi Javed : "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss"; उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 01:17 PM2023-01-04T13:17:15+5:302023-01-04T13:22:28+5:30
Uorfi Javed And BJP Chitra Wagh : उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला (Uorfi Javed) बेड्या घालण्याची मागणी केली होती. उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. याला उर्फीने देखील उत्तर दिलं होतं.
उर्फी जावेदने यानंतर आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss" असं म्हटलं आहे. उर्फी याआधी "जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे" असं म्हणत चित्रा वाघ यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. "मला ट्रायल किंवा हा मूर्खपणाच नको आहे. जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे. एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमावतो हे आधी जगाला सांगा. वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झाले आहेत. याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत" असं उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
We are going to be besties soon chitruuuu! https://t.co/82YhfGIkkj
— Uorfi (@uorfi_) January 3, 2023
उर्फीने चित्रा वाघ यांना यासोबतच एक सल्ला देखील दिला आहे. "माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली कल्पना आहे. मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, जे अजूनही चालू आहेत" असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा", अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
"समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"
चित्रा वाघ यांनी उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला लगावला आहे. "व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच, समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एवढी सदिच्छा आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?" असा सवालही विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं असून सुषमा अंधारेंवर हल्लाबोल केला आहे. "जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?" असंही म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"