UP Goa Election Result 2022 : गोवा-युपीत 'म्याव-म्याव'चा आवाजच आला नाही; नितेश राणेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:04 PM2022-03-10T15:04:22+5:302022-03-10T15:06:04+5:30

UP Goa Election Result 2022 : आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातील कलांवरून भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येतंय.

UP Goa Election Result 2022 bjp leader nitesh rane criticize shiv sena election results aditya thackeray | UP Goa Election Result 2022 : गोवा-युपीत 'म्याव-म्याव'चा आवाजच आला नाही; नितेश राणेंचा खोचक टोला

UP Goa Election Result 2022 : गोवा-युपीत 'म्याव-म्याव'चा आवाजच आला नाही; नितेश राणेंचा खोचक टोला

googlenewsNext

UP Goa Election Result 2022 : आज पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशातील कलांवरून भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र दिसून येतंय. उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनीही आपलं नशीब आजमावलं होतं. परंतु दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशातील निकालांवरुन खोचक टोला लगावला आहे.

"गोवा आणि उत्तर प्रदेशात 'म्याव-म्याव'चा आवाजच ऐकू आला नाही. खुपच वाईट, अत्यंत दु:ख झालं," असं म्हणत नितेश राणेंनी खोचक टोला लगावला. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप बहुमताच्या दिशेनं जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातही पुन्हा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 
यापूर्वीही 'म्याव-म्याव'चा व्हिडीओ झाला होता व्हायरल
यापूर्वी नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून 'म्याव-म्याव' असा आवाज काढला होता. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला होता. तसंच आपण आदित्य ठाकरे यांना पाहूनच आपण म्याव, म्याव केलं. कारण आधी वाघाची डरकाळी देणाऱ्या शिवसेनेची अवस्थाच म्याव, म्याव सारखी झाली आहे, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

Web Title: UP Goa Election Result 2022 bjp leader nitesh rane criticize shiv sena election results aditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.